advertisement

तारीख लक्षात ठेवा! 26 मार्चला कपलसाठी खास, 4 राशींच्या नात्यात वाढणार रोमांस; लग्न होणार फिक्स

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, सुख, संपत्ती आणि प्रेमाचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह 26 मार्च 2026 रोजी पहाटे 5 वाजून 13 मिनिटांनी मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करणार आहे.
1/7
ज्योतिषशास्त्रानुसार, सुख, संपत्ती आणि प्रेमाचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह 26 मार्च 2026 रोजी पहाटे 5 वाजून 13 मिनिटांनी मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राचे हे संक्रमण 'अग्नी तत्त्वाच्या' राशीत होत असल्याने प्रेमसंबंधांमध्ये एक नवीन ऊर्जा आणि उत्साह पाहायला मिळेल.

2/7
शुक्र जेव्हा मेष राशीत येतो, तेव्हा तो व्यक्तीला अधिक धाडसी आणि स्पष्टवक्ता बनवतो. मीन राशीतील शुक्राची भावुकता आता मेष राशीत आल्यावर 'कृती' मध्ये बदलेल. ज्यांचे प्रेमप्रकरण अनेक दिवसांपासून रखडले आहे किंवा ज्यांना लग्नासाठी जोडीदार मिळत नाहीये, त्यांच्यासाठी ग्रहांची ही स्थिती अनुकूल असेल.

3/7
मेष: शुक्र तुमच्याच राशीत प्रवेश करत असल्याने तुमच्या सौंदर्यात आणि व्यक्तिमत्त्वात कमालीची भर पडेल. तुमचे आकर्षण वाढल्याने जोडीदार तुमच्याकडे अधिक ओढला जाईल. जे सिंगल आहेत, त्यांच्या आयुष्यात एखाद्या खास व्यक्तीची एन्ट्री होऊ शकते. वैवाहिक आयुष्यातील जुने वाद संपून पुन्हा एकदा प्रेमाचे नाते घट्ट होईल.

4/7
तूळ: शुक्राचे हे संक्रमण तुमच्या सातव्या भावात होणार आहे. जे तरुण-तरुणी लग्नासाठी जोडीदार शोधत आहेत, त्यांना अपेक्षित स्थळ मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रेमविवाह करू इच्छिणाऱ्यांना घरच्यांकडून संमती मिळू शकते. जोडीदारासोबतचे नाते अधिक रोमँटिक आणि विश्वासार्ह बनेल.

5/7
धनु: धनु राशीच्या पाचव्या भावात शुक्राचे आगमन होणार आहे. यामुळे तुमच्या लव्ह लाईफमध्ये नवा उत्साह निर्माण होईल. जर तुमच्या मनात कोणाबद्दल प्रेम असेल, तर ते व्यक्त करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. जुन्या प्रियकराशी पुन्हा भेट होण्याचे किंवा संबंध सुधारण्याचे योग आहेत. नात्यात आलेली मरगळ दूर होऊन उत्साहाचे वातावरण राहील.

6/7
कुंभ: कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचे गोचर तिसऱ्या भावात होणार असून ते तुमच्या सातव्या भावावर दृष्टी टाकेल. यामुळे तुमच्या संवाद कौशल्यात सुधारणा होईल, ज्यामुळे तुम्ही जोडीदाराचे मन सहज जिंकू शकाल. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे किंवा छोट्या सहलीचे नियोजन होईल. कुटुंबाकडून लग्नासाठी हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.

7/7
शुक्र-मंगळ युतीचा प्रभाव: मेष राशीत मंगळ आणि शुक्राची ऊर्जा एकत्र येत असल्याने प्रेमात धाडस वाढेल. तुम्ही तुमच्या नात्याबद्दल अधिक स्पष्ट आणि प्रामाणिक राहाल. विनाकारण लपवाछपवी करण्यापेक्षा जोडीदाराशी थेट संवाद साधल्यास मोठे फायदे होतील. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement