महाराष्ट्रात सगळीकडेच रंगपंचमीचा मोठा उत्साह सुरु आहे. तसेच नाशिकमध्येही हा उत्साह सुरु आहे. त्यातच आता नाशिकमध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजमन यांनीही रंगपंचमीचा आनंद लुटला आहे. नाशिकच्या शनीचर परिसरातील पेशवेकालीन रहाडीत त्यांनी उडी मारत पारंपरिक रंगपंचमी खेळली आहे. गिरीश महाजन यांच्यासोबत नाशिकमध्ये भाजपचे स्थानिक नेतेही उपस्थित होते.



