advertisement

T20 World Cup : ब्लंडर, ब्लंडर, ब्लंडर... टीम इंडियाने वेस्ट इंडिजच्या हातात दिली मॅच, सेमी फायनलची धाकधूक वाढली

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपच्या डू ऑर डाय सामन्यात वेस्ट इंडिजने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 195 रन केल्या आहेत.

ब्लंडर, ब्लंडर, ब्लंडर... टीम इंडियाने वेस्ट इंडिजच्या हातात दिली मॅच, सेमी फायनलची धाकधूक वाढली
ब्लंडर, ब्लंडर, ब्लंडर... टीम इंडियाने वेस्ट इंडिजच्या हातात दिली मॅच, सेमी फायनलची धाकधूक वाढली
कोलकाता : टी-20 वर्ल्ड कपच्या डू ऑर डाय सामन्यात वेस्ट इंडिजने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 195 रन केल्या आहेत. रोव्हमन पॉवेल आणि जेसन होल्डर यांच्यात 35 बॉलमध्ये नाबाद 76 रन केले. पॉवेलने 19 बॉलमध्ये नाबाद 34 आणि जेसन होल्डरने 22 बॉलमध्ये नाबाद 37 रन केले. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, पण टीम इंडियाने फिल्डिंगमध्ये खराब कामगिरी करून वेस्ट इंडिजला एवढ्या मोठ्या स्कोअरपर्यंत पोहोचवलं.
या सामन्यात टीम इंडियाच्या फिल्डिंगनेही निराशा केली. पॉवर प्ले मध्येच अभिषेक शर्माने रोस्टन चेसचा सोपा कॅच सोडला. यानंतर 19 व्या ओव्हरमध्ये अभिषेकने पुन्हा एकदा रोव्हमन पॉवेलचे कॅच सोडला. तर वरुण चक्रवर्तीने रन आऊटची संधी असतानाही गोंधळ घातला, त्यामुळे चेसला आणखी एक जीवनदान मिळालं. यानंतर 13 व्या ओव्हरमध्ये तिलक वर्माने शरफेन रदरफोर्डचा कॅच पकडताना चूक केली. तिलक वर्मा हा बाऊंड्री लाईनच्या पुढे उभा होता आणि त्याच्या हातावरून बॉल गेला. तिलक बाऊंड्री लाईनवर उभा असता तर त्याला हा कॅच सहज पकडता आला असता.
advertisement

अर्शदीपच्या एका ओव्हरला आल्या 24 रन

इनिंगच्या 16 व्या ओव्हरमध्ये अर्शदीप सिंगने तब्बल 24 रन दिल्या. रोव्हमन पॉवेलने अर्शदीपच्या ओव्हरमध्ये दोन सिक्स आणि एक फोर मारल्या, तसंच अर्शदीपने वाईड आणि 4 रन अशा एकूण 5 रनही दिल्या. या ओव्हरनंतर वेस्ट इंडिजला पुन्हा एकदा मोमेन्टम मिळालं. वरुण चक्रवर्तीच्या पुढच्याच ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजने 14 रन दिल्या.
advertisement

टीम इंडियासाठी करो या मरो

टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलला पोहोचायचं असेल, तर टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवावाच लागणार आहे. या सामन्यात पराभव झाला तर टीम इंडियाचं टी-20 वर्ल्ड कपमधलं आव्हान संपुष्टात येईल. तर दुसरीकडे वेस्ट इंडिजचा विजय झाला तर ते सेमी फायनलमध्ये पोहोचतील.

भारताची प्लेइंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : ब्लंडर, ब्लंडर, ब्लंडर... टीम इंडियाने वेस्ट इंडिजच्या हातात दिली मॅच, सेमी फायनलची धाकधूक वाढली
Next Article
advertisement
How Khamenei Killed: एका सीक्रेट मीटिंगने अयातुल्ला खामेनेईंचा घात केला, थरकाप उडवणारा अंत; 30 बॉम्बांचा महाप्रहारची इनसाइड स्टोरी
एका सीक्रेट मीटिंगने अयातुल्ला खामेनेईंचा घात केला, थरकाप उडवणारा अंत
  • मोसादची अचूक वेळ आणि अमेरिकेचा फास

  • गुप्त बैठकीत घुसून खामेनेईंचा खात्मा

  • अभेद्य समजल्या जाणाऱ्या संकुलाची राखरांगोळी

View All
advertisement