advertisement

'तोंड सांभाळून बोलायचं...', भारताविरुद्धच्या पराभवानंतर नको ते बोलला, PCB ने पाकिस्तानी खेळाडूला झापलं!

Last Updated:

भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा ऑलराऊंडर शादाब खान हा त्याच्या वक्तव्यामुळे वादात सापडला आहे. शादाब खानला त्याच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही इशारा दिला आहे.

'तोंड सांभाळून बोलायचं...', भारताविरुद्धच्या पराभवानंतर नको ते बोलला, PCB ने पाकिस्तानी खेळाडूला झापलं!
'तोंड सांभाळून बोलायचं...', भारताविरुद्धच्या पराभवानंतर नको ते बोलला, PCB ने पाकिस्तानी खेळाडूला झापलं!
मुंबई : भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा ऑलराऊंडर शादाब खान हा त्याच्या वक्तव्यामुळे वादात सापडला आहे. शादाब खानला त्याच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही इशारा दिला आहे. शादाब खानने त्याच्या भाषेवर नियंत्रण ठेवावं, असा सज्जड दम पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिला आहे.
भारताविरुद्धच्या दारूण पराभवानंतर पाकिस्तानी क्रिकेट टीमवर चौफेर टीका होत आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू टीमच्या सध्याच्या खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मोहम्मद युसूफने तर बाबर आझम, शाहिन आफ्रिदी आणि शादाब खान यांना टीममधून बाहेर करण्याची मागणी केली. मोहम्मद युसूफच्या या मागणीवर शादाब खानने भर पत्रकार परिषदेत पलटवार केला, त्यामुळे हा वाद आणखी पेटला.
advertisement
'आमच्या माजी क्रिकेटपटूंची स्वत:ची मतं असतील, त्यांनी पाकिस्तानकडून खेळताना चांगली कामगिरी केली, पण त्यांनाही वर्ल्ड कपमध्ये भारताला पराभूत करता आलं नाही. आमच्या टीमने 2021 साली वर्ल्ड कपमध्ये भारताला पराभूत केलं, जे इतिहासात फक्त एकदाच झालं आहे. मोहम्मद युसूफ महान क्रिकेटपटू आहेत, पण त्याने भारताविरुद्ध उल्लेखनीय असं काही केलं नाही', असं शादाब खान म्हणाला.
advertisement
पीसीबीने पाकिस्तान टीम मॅनेजमेंटकडे याबाबत नाराजी व्यक्त केली. तसंच शादाब खानने मर्यादा ओलांडल्या असल्याचा इशाराही पीसीबीने दिला. शादाबचे सासरे शकलेन मुश्ताक यांच्यासह पाकिस्तानचे सर्व माजी खेळाडू दिग्गज आहेत, त्यांचा आदर केला पाहिजे. खेळाडूंनी अशी भाषा वापरू नये, असे ताशेरे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शादाब खानवर ओढले.
शादाबच्या या वादानंतर पीसीबीने इतर खेळाडूंनाही इशारा दिला आहे. खेळाडूंनी फक्त मॅचसंबंधी वक्तव्य कराव्यात आणि प्रतिक्रिया द्याव्यात, असे आदेश पीसीबीने खेळाडूंना दिले आहेत. तसंच यापुढे कोणत्या खेळाडूने मर्यादा ओलांडल्या तर बोर्ड त्यांच्यावर कठोर कारवाई करू शकते, अशी वॉर्निंगही पीसीबीने खेळाडूंना दिली आहे.
advertisement

सुपर-8 ची लढत

नामिबियाविरुद्ध 102 रननी विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानची टीम सुपर-8 मध्ये पोहोचली आहे. सुपर-8 मध्ये पाकिस्तानचा पहिला सामना 21 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 24 फेब्रुवारीला पाकिस्तान इंग्लंडविरुद्ध पल्लेकेले येथे आणि 28 फेब्रुवारीला श्रीलंकेविरुद्ध खेळेल. सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला या 3 सामन्यांपैकी कमीत कमी 2 सामन्यांमध्ये विजय मिळवणं गरजेचं आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'तोंड सांभाळून बोलायचं...', भारताविरुद्धच्या पराभवानंतर नको ते बोलला, PCB ने पाकिस्तानी खेळाडूला झापलं!
Next Article
advertisement
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement