advertisement

T20 World Cup : 'वानखेडेचा आवाज शांत करू...', सेमी फायनलआधी इंग्लंडच्या खेळाडूची पॅट कमिन्ससारखी धमकी!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपची दुसरी सेमी फायनल 5 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याआधी इंग्लंडच्या खेळाडूने टीम इंडियाला डिवचलं आहे.

'वानखेडेचा आवाज शांत करू...', सेमी फायनलआधी इंग्लंडच्या खेळाडूची पॅट कमिन्ससारखी धमकी!
'वानखेडेचा आवाज शांत करू...', सेमी फायनलआधी इंग्लंडच्या खेळाडूची पॅट कमिन्ससारखी धमकी!
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपची दुसरी सेमी फायनल 5 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात हा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. या सामन्याआधी इंग्लंडच्या खेळाडूने टीम इंडियाला डिवचलं आहे.
मुंबईमधील वानखेडे स्टेडियम हे प्रेक्षकांचा उत्साह आणि जल्लोषासाठी ओळखलं जातं, पण याच प्रेक्षकांचा आवाज शांत करणार असल्याचं वक्तव्य इंग्लंडच्या खेळाडूने केलं आहे. 'वानखेडे स्टेडियम हे भव्य आणि प्रतिष्ठित स्टेडियम आहे. मला विश्वास आहे की गुरुवारी रात्री या स्टेडियममध्ये खूप शांतता असेल. तरुण क्रिकेटपटू म्हणून तुम्ही भारताविरुद्ध वर्ल्ड कप सेमी फायनल खेळण्याचं स्वप्न पाहता,', असं इंग्लंडचा ऑलराऊंडर सॅम करन म्हणाला आहे.
advertisement

कमिन्सच्या वक्तव्याची आठवण

वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी ही बॅटिंगसाठी चांगली असते, तसंच हे मैदानही लहान आहे, त्यामुळे सेमी फायनलमध्ये मोठा स्कोअर होईल, असं वक्तव्य सॅम करनने केलं आहे. 2023 वनडे वर्ल्ड कपच्या फायनलआधी पॅट कमिन्सने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच्या एक लाख प्रेक्षकांना शांत करण्याचं वक्तव्य केलं होतं. कमिन्सने विराटची विकेट घेऊन ही इच्छा पूर्ण केली होती, आता सॅम करननेही टीम इंडियाला कमिन्ससारखीच धमकी दिली आहे.
advertisement
'भारताविरुद्धच्या दबावाला इंग्लंड घाबरणार नाही. आम्हाला भारतामध्ये खेळण्याची सवय आहे. आमच्या बहुतेक खेळाडूंनी टीम इंडियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, तसंच आयपीएलमध्येही भाग घेतला आहे', अशी प्रतिक्रिया करनने दिली. 'टीम इंडिया उत्कृष्ट आहे, पण आम्हीही तयार आहोत. इंग्लंडला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये खेळावं लागलं आहे. आम्ही श्रीलंकेमध्ये नंतर इथे आणि मग कोलकात्यामध्ये खेळलो. प्रत्येक ठिकाणी परिस्थिती वेगळी होती आणि आम्ही सगळीकडे जुळवून घेतलं', असं सॅम करन म्हणाला.
advertisement

आयपीएलला श्रेय

सॅम करनने इंग्लंडच्या वर्ल्ड कपमधल्या कामगिरीचं श्रेय आयपीएलला दिलं आहे. आम्ही भारतामध्ये खूप क्रिकेट खेळतो, आम्हाला इथली मैदानं आणि परिस्थिती चांगली माहिती आहे, आयपीएलने यात मोठी भूमिका बजावली आहे, असं वक्तव्य करनने केलं आहे.

कोण जिंकणार टी-20 वर्ल्ड कप?

टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचलेल्या चारही टीम सर्वोत्तम आहेत. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडच्या टीम उत्तम आहेत, आम्ही आणि टीम इंडियाही मजबूत आहे. मला वाटतं की चारही सर्वोत्तम टीम सेमी फायनलमध्ये आहेत, ट्रॉफी कोण घेऊन जाणार हे सांगणं कठीण आहे, असं विधान सॅम करनने केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : 'वानखेडेचा आवाज शांत करू...', सेमी फायनलआधी इंग्लंडच्या खेळाडूची पॅट कमिन्ससारखी धमकी!
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement