advertisement

Tilak Varma : 'व्हिडिओ रेकॉर्ड करू नको...', तिलक वर्मा अर्शदीपवर संतापला, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधली क्लिप लीक!

Last Updated:

अर्शदीपने टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड केला, या व्हिडिओमध्ये तिलक वर्माही दिसत आहे, पण अर्शदीप व्हिडिओ बनवत असल्याचं पाहून तिलक नाराज झाला.

'व्हिडिओ रेकॉर्ड करू नको...', तिलक वर्मा अर्शदीपवर संतापला, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधली क्लिप लीक!
'व्हिडिओ रेकॉर्ड करू नको...', तिलक वर्मा अर्शदीपवर संतापला, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधली क्लिप लीक!
नवी मुंबई : टीम इंडियाचा स्टार फास्ट बॉलर अर्शदीप सिंग हा अनेकदा मस्करीच्या मूडमध्ये असतो. सोशल मीडियावर अर्शदीप त्याचे आणि टीम इंडियाच्या खेळाडूंसोबतचे व्हिडिओ पोस्ट करत असतो. टी-20 वर्ल्ड कपच्या वॉर्म अप मॅचनंतरही अर्शदीपने टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड केला, या व्हिडिओमध्ये तिलक वर्माही दिसत आहे, पण अर्शदीप व्हिडिओ बनवत असल्याचं पाहून तिलक नाराज झाला.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये बुधवारी नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये प्रॅक्टिस मॅच झाली, यानंतर अर्शदीपने ड्रेसिंग रूममध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओमध्ये तिलक वर्मा जेवताना दिसत आहे, तेव्हाच अर्शदीप सिंग तिलकच्या परवानगीशिवाय त्याचा व्हिडिओ बनवत आहे. अर्शदीप व्हिडिओ बनवत असल्याचं समजल्यानंतर तिलक वर्मा नाराज झाला आणि त्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग थांबवायला सांगितलं, पण नंतर तिलकही अर्शदीपसोबत मस्करी करत असल्याचं स्पष्ट झालं.
advertisement
advertisement

तिलक वर्माचं कमबॅक

शस्त्रक्रियेनंतर तिलक वर्माचं टीम इंडियामध्ये कमबॅक झालं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तिलक वर्माने 19 बॉलमध्ये 45 रनची आक्रमक खेळी केली, ज्यात 3 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता.
तिलक वर्मा हा टी-20 मध्ये टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरमधला सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू बनला आहे. आशिया कपच्या फायनलमध्ये तिलक वर्माने एकट्याने भारताला रोमांचक विदय मिळवून दिला. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही गतविजेती टीम इंडिया प्रबळ दावेदार मानली जात आहे. टीम इंडियाची वर्ल्ड कपमधली कामगिरी तिलक वर्माच्या बॅटिंगवर अवलंबून असणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Tilak Varma : 'व्हिडिओ रेकॉर्ड करू नको...', तिलक वर्मा अर्शदीपवर संतापला, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधली क्लिप लीक!
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement