VIDEO : 33 सेकंदात अख्खी मॅच फिरली! मैदानात सगळ्यांचाच श्वास रोखला, मॅचमध्ये नेमकं काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
झिम्बाबेने ऑस्ट्रेलियासमोर 169 धावांचे लक्ष्य ठेवले होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला होता. पण तरी शेवटच्या क्षणी ऑस्ट्रेलिया सामना फिरवेल असे वाटत होते. पण टोनी मुनयोंगोने बाऊंन्ड्री लाईनवर खतरनाक कॅच घेतली होती.
Zimbabwe vs Australia : टी20 वर्ल्डकपमध्ये आज बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करून झिम्बाबेने मोठा उलटफेर केला आहे. झिम्बाबेच्या या मोठ्या विजयात सगळ्याच खेळाडूंच मोठं योगदान आहे. पण या सगळ्यांपेक्षा त्याच योगदान खूप मोठं आहे.कारण त्याने मोक्याच्या क्षणी घेतलेल्या एका कॅचमुळे संपूर्ण सामना फिरला होता.या कॅचचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
झिम्बाबेने ऑस्ट्रेलियासमोर 169 धावांचे लक्ष्य ठेवले होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला होता. पण तरी शेवटच्या क्षणी ऑस्ट्रेलिया सामना फिरवेल असे वाटत होते. पण टोनी मुनयोंगोने बाऊंन्ड्री लाईनवर खतरनाक कॅच घेतली होती. ही कॅच कॅच ऑफ द टूर्नामेंट होती. कारण अशी कॅच आतापर्यंत स्पर्धेत कुणालाच घेता आले नाही.
TONY MUNYONGO WITH THE CATCH OF THE TOURNAMENT. 🤯
pic.twitter.com/zgOJCzcSEw
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 13, 2026
advertisement
ऑस्ट्रेलियाला 14 बॉलमध्ये 39 धावांची आवश्यकता असताना बेन द्वारशूईसने जोखिम पत्करत बाऊंन्ड्री लाईनवर बॉल मारला होता. पण टोनी मुनयोंगोने डाव्या दिशेने धावत जात डाईव्ह मारून खतरनाक कॅच घेतला. हा कॅच खूपच कठीण होता. पण टोनी मुनयोंगोने मैदानात सूर मारून हा कॅच घेतला होता.हा कॅच पाहून सगळ्यांचा श्वास रोखला होता.कारण या कॅचनंतर झिम्बाबेचा विजय जवळपास निश्चित झाला होता. त्यानंतर झिम्बाबेने शेवटच्या खेळाडूला रनआऊट करून हा सामना जिंकला होता.
advertisement
झिम्बाबेने ऑस्ट्रेलियाला दिलेल्या 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सूरूवात खराब झाली होती.ऑस्ट्रेलियाचा जोश इंग्लिश 8 तर कॅप्टन ट्रॅविस हेडने 17 धावांवर आऊट झाले होते.त्यानंतक कॅमरन ग्रीन आणि टीम डेविड दोघेही शुन्यावर आऊट झाले होते. ऑस्ट्रेलियाची पाचव्या ओव्हरमध्ये 29 वर 4 विकेट अशी बिकट अवस्था झाली होती.त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने 31 आणि मॅट रेन्शॉने 65 धावांची खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण हे दोन्ही खेळाडू बाद झाल्यानंतर इतर खेळाडू एकेरी धाव काढून बाद झाले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया 146 धावांवर ऑल आऊट झाली होती. त्यामुळे झिम्बाबेने हा सामना 23 धावांनी जिंकला होता.
advertisement
झिम्बाबेकडून यावेळी ब्लेसिंग मुजरबानीने सर्वाधिक 4 विकेट तर ब्रॅड इ्वानने 3 विकेट, रायन बुरल आणि वेलिंग्टन मसाकडझाने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
झिम्बाबेच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर ब्रायन बेनेटने सर्वाधित 64 धावांची नाबाद खेळी केली होती.रायन बुरल आणि तादीवानाशे मुरूमानीन या दोघांनी प्रत्येकी 35 धावांची खेळी केली होती.आणि सिकंदर राजा 25 धावांवर नाबाद राहिला होता. या बळावर झिम्बाबेने 2 विकेट गमावून 169 धावा केल्या होत्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 13, 2026 3:55 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : 33 सेकंदात अख्खी मॅच फिरली! मैदानात सगळ्यांचाच श्वास रोखला, मॅचमध्ये नेमकं काय घडलं?







