advertisement

Vaibhav Sooryavanshi : 'सीनियरकडे दुर्लक्ष, अजिबात ऐकत नाही ', ऍटिट्यूडच वैभवला धोका देणार? इंडियाच्या कॅप्टनकडून पोलखोल!

Last Updated:

आयपीएलच्या या मोसमात सगळ्यांचं लक्ष वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे असेल, पण त्याआधीच टीम इंडियाच्या क्रिकेटपटूने वैभव सूर्यवंशीच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

'सीनियरकडे दुर्लक्ष, अजिबात ऐकत नाही ', ऍटिट्यूडच वैभवला धोका देणार? कॅप्टनकडून पोलखोल!
'सीनियरकडे दुर्लक्ष, अजिबात ऐकत नाही ', ऍटिट्यूडच वैभवला धोका देणार? कॅप्टनकडून पोलखोल!
मुंबई : आयपीएल 2026 सुरू व्हायला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आयपीएलच्या या मोसमात सगळ्यांचं लक्ष वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे असेल. 27 मार्चला वैभव 15 वर्षांचा होणार आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात पहिल्यांदाच खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीने धमाका केला होता. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात 35 बॉलमध्ये शतक करून इतिहास घडवला.
आयपीएल 2025 नंतर वैभव सूर्यवंशी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यावर गेला, तिथे इंडिया अंडर-19 कडून खेळतानाही वैभवने उत्कृष्ट बॅटिंग केली. एवढंच नाही तर यावर्षी झालेल्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये वैभवने धुंवाधार बॅटिंग करून टीम इंडियाला ट्रॉफी जिंकवली.

वैभव प्रोफेशनल नाही

आता आयपीएल 2026 साठी वैभव सूर्यवंशी सज्ज झाला आहे, पण त्याआधीच वैभवच्या खेळापेक्षा त्याच्या वर्तनाची चर्चा सुरू झाली आहे. टीम इंडिया आणि आरसीबीचा क्रिकेटपटू जितेश शर्मा याने वैभव सूर्यवंशीच्या वर्तनाबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. वैभव सूर्यवंशीकडे जगातल्या सर्वोत्तम खेळाडूंना मागे टाकण्याची क्षमता आहे, पण मैदानाबाहेरच्या त्याच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह आहे, असं जितेश शर्मा म्हणाला आहे. वैभव सूर्यवंशी मागच्या वर्षी रायजिंग स्टार्स आशिया कपमध्ये जितेश शर्माच्या कॅप्टन्सीमध्ये खेळला होता.
advertisement

वैभवला प्रोफेशनल बनवण्याचा प्रयत्न

'वैभव जगावर राज्य करू शकतो, त्याच्याकडे गियर नंबर 6 आहे, पण तो प्रोफेशनल नाही. आम्ही त्याला प्रोफेशनल बनवण्याचा प्रयत्न करत आहोत, पण तो पूर्णपणे प्रोफेशनल होईल, असं मला वाटत नाही. मैदानात तो वेगळा आहे, पण बाहेर... मी त्याला रात्री आईसक्रीमही न खाण्याचा सल्ला देतो', असं जितेश शर्मा म्हणाला आहे.
advertisement

वैभवची बॅटिंग पाहून एबी प्रभावित

दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स मात्र वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगने पूर्ण प्रभावित झाला आहे. वैभव परिपक्व आणि प्रोफेशनल आहे, असं एबी डिव्हिलियर्स म्हणाला आहे. अंडर-19 वर्ल्ड कप फायनलमध्ये वैभवने 175 रनची वादळी खेळी केली होती, एबीने वैभवच्या या खेळीची आठवण करून दिली. इतक्या कमी वयात मोठ्या मंचावर सातत्याने अशी कामगिरी करणं सोपं नाही, पण वैभवने प्रत्येक वेळी त्याच्या खेळाची ओळख कायम ठेवली, अशी प्रतिक्रिया एबी डिव्हिलियर्सने दिली आहे.
advertisement
वैभव सूर्यवंशीसाठी खरं आव्हान आयपीएल 2026 मध्ये असेल, कारण अनेक बॉलरनी त्याचे कमकुवत दुवे शोधून काढले असतील, त्यामुळे वैभवला आता विरोधी टीमच्या या रणनीतीचा सामना करावा लागणार आहे. या मोसमातही वैभवने पुन्हा एकदा धमाकेदार बॅटिंग केली, तर तो टीम इंडियामध्ये निवड व्हायच्या आणखी जवळ पोहोचेल.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Sooryavanshi : 'सीनियरकडे दुर्लक्ष, अजिबात ऐकत नाही ', ऍटिट्यूडच वैभवला धोका देणार? इंडियाच्या कॅप्टनकडून पोलखोल!
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement