Vaibhav Suryvanshi : 14 वर्षात वैभव सुर्यवंशीला मोठा मान, 'या' दिग्गजांसोबत स्पर्धेत झळकणार
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भारताचा 14 वर्षीय स्टार खेळाडू वैभव सुर्यवंशी क्रिकेटचे मैदानात गाजवत आहे. आता तो पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे.या दौऱ्यापूर्वी वैभव सुर्यवंशीला मोठा मान मिळाला आहे.
Vaibhav Suryvanshi Pro Kabaddi League Season 12 : भारताचा 14 वर्षीय स्टार खेळाडू वैभव सुर्यवंशी क्रिकेटचे मैदानात गाजवत आहे. आता तो पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे.या दौऱ्यापूर्वी वैभव सुर्यवंशीला मोठा मान मिळाला आहे.विशेष म्हणजे ज्या वयात वैभवला जो मान मिळाला आहे, तसा मान सहजासहजी कुणाला मिळाला नाही. विशेष म्हणजे दिग्गाजांसोबत तो झळकणार आहे.त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे वैभव सुर्यवंशीला नेमका कोणता मान मिळाला आहे? हे जाणून घेऊयात.
उद्यापासून प्रो कबड्डी लीगच्या 12 व्या सीझनला सुरुवात होणार आहे. या सीझनमध्ये वैभव सूर्यवंशी दिसणार आहे. पीकेएल शुक्रवार (29 ऑगस्ट) पासून विशाखापट्टणम येथे सुरू होत आहे. सीझनच्या लाँचिंग प्रसंगी वैभव सूर्यवंशीलाही आमंत्रित करण्यात आले आहे. तो राष्ट्रीय क्रीडा दिनापासून सुरू होणाऱ्या या लीगमध्ये आपली उपस्थिती दर्शवणार आहे.
डावखुरा सलामीवीर वैभवने खूप कमी वेळात जागतिक क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवले आहे. आयपीएलच्या पहिल्याच सीझनमध्ये शतक झळकावून वैभवने अनेक प्रशंसा मिळवल्या आहेत. पीकेएलच्या उद्घाटन समारंभात वैभवसोबतच इतर अनेक खेळाडू आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
advertisement
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा वैभव सूर्यवंशी म्हणाला, राष्ट्रीय क्रीडा दिन मला आठवण करून देतो की खेळ सर्वांना कसे एकत्र आणतो. खेळणे तुम्हाला टीमवर्क, शिस्त आणि लवचिकता शिकवते. राजस्थान रॉयल्सचा भाग असल्याने, शिकत असल्याचे आणि माझी स्वप्ने पूर्ण केल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. मला आशा आहे की माझ्यासारखे आणखी मुले खेळायला सुरुवात करतील आणि स्वतःवर विश्वास ठेवतील.
advertisement
प्रो कबड्डी लीगच्या 12 व्या हंगामाचे उद्घाटन बॅडमिंटन दिग्गज पुलेला गोपीचंद, माजी भारतीय हॉकी कर्णधार धनराज पिल्लई, कबड्डी सुपरस्टार प्रदीप नरवाल आणि टीम इंडियाचा अंडर-19
संघाचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी यांच्या हस्ते होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 28, 2025 10:29 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryvanshi : 14 वर्षात वैभव सुर्यवंशीला मोठा मान, 'या' दिग्गजांसोबत स्पर्धेत झळकणार