Virat Kohli : मॅच Live दाखवणार नाही, प्रेक्षकांनाही नो एन्ट्री, विराटच्या फॅन्ससोबत BCCI चा प्रॉब्लेम काय?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
बुधवारपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे वनडे ट्रॉफीमध्ये स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासह अनेक अव्वल भारतीय क्रिकेटपटू सहभागी होतील.
मुंबई : बुधवारपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे वनडे ट्रॉफीमध्ये स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासह अनेक अव्वल भारतीय क्रिकेटपटू सहभागी होतील. रोहित आणि विराट 2027 च्या वनडे वर्ल्ड कपची तयारी म्हणून या स्पर्धेत भाग घेणार आहेत, तर टी-20 वर्ल्ड कपमधून वगळण्यात आलेल्या शुभमन गिलची प्रतिष्ठाही पणाला लागणार आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या स्टार खेळाडूंमध्ये ऋषभ पंत, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा यांची नावे आहेत, पण कोहली आणि रोहितने सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं आहे.
विराट-रोहितची बॅटिंग पाहता येणार नाही
विराट कोहली 15 वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. या स्पर्धेत त्याचा सहभाग स्पष्टपणे दर्शवितो की विराट आणि रोहित हे दोघं बदलत्या भारतीय क्रिकेट व्यवस्थेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जरी ही स्पर्धा स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सकाळी 9 वाजता सुरू होईल आणि हॉटस्टार अॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल, तरी चाहत्यांना विराट आणि रोहितच्या बॅटिंगचा आनंद घेता येणार नाही.
advertisement
विराट आणि रोहितचा सामना लाईव्ह का होणार नाही?
खरं तर, विजय हजारे ट्रॉफी सामन्यांचे आयोजन करणाऱ्या सर्व मैदानांपैकी, प्रसारण सुविधा फक्त अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आणि राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर उपलब्ध आहेत. विराट कोहलीची टीम, दिल्ली, एलिट ग्रुप डी मध्ये आंध्र प्रदेशविरुद्ध विरुद्ध बंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे पहिला सामना खेळेल, तर रोहित शर्माची मुंबई टीम जयपूरमध्ये खेळेल आणि दोन्ही ठिकाणांहून थेट प्रक्षेपण शक्य नाही. विराट ज्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दोन सामने खेळणार आहे, तिथे प्रेक्षकांनाही एन्ट्री मिळणार नाहीये. प्रेक्षकांना बसण्याची सोय नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
विजय हजारे ट्रॉफीमधील विराट आणि रोहितच्या कामगिरीचा पुढील महिन्यात होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी त्यांच्या निवडीवर परिणाम होणार नाही, पण तरुण खेळाडू स्पर्धा देत आहेत, हे दोघांनाही चांगलंच माहिती आहे.
view commentsLocation :
Bangalore,Karnataka
First Published :
Dec 23, 2025 8:59 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Virat Kohli : मॅच Live दाखवणार नाही, प्रेक्षकांनाही नो एन्ट्री, विराटच्या फॅन्ससोबत BCCI चा प्रॉब्लेम काय?









