Virat Kohli : विराट कोहली उद्या धमाका करणार! विजय हजारे ट्रॉफीची Live मॅच कधी-कुठे पाहाल?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारतातली 50 ओव्हर फॉरमॅटची देशांतर्गत स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफीला बुधवार 24 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. विराट कोहली या स्पर्धेत दिल्लीकडून खेळणार आहे.
बंगळुरू : भारतातली 50 ओव्हर फॉरमॅटची देशांतर्गत स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफीला बुधवार 24 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. विराट कोहली तब्बल 15 वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी खेळणार असल्यामुळे स्पर्धेला महत्त्व प्राप्त झालं आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीचा पहिला सामना आंध्र प्रदेशविरुद्ध होणार आहे. हा सामना भारतीय क्रिकेट चाहत्यांना टीव्ही आणि मोबाईलवरही पाहता येणार आहे.
विराट कोहली टेस्ट आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे, त्यामुळे आता तो फक्त वनडे क्रिकेट खेळत आहे, त्यामुळे तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभागी होत आहे. विराट या स्पर्धेच्या पहिल्या दोनच सामन्यांमध्ये खेळणार आहे. यातला पहिला सामना बुधवारी आहे.
कुठे होणार सामना?
विजय हजारे ट्रॉफीमध्ये आंध्र प्रदेश विरुद्ध दिल्लीचा सामना बंगळुरूच्या बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये खेळला जाणार आहे. आधी ही मॅच चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार होती, पण परवानगी न मिळाल्यामुळे ठिकाण बदलण्यात आलं.
advertisement
किती वाजता सुरू होणार सामना?
आंध्र प्रदेश विरुद्ध दिल्लीचा हा सामना बुधवार, 24 डिसेंबरला सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे.
आंध्र प्रदेशची टीम
नितीश कुमार रेड्डी (कॅप्टन), केएस भरत (विकेट कीपर), रिकी भुई, हेमंत रेड्डी, शेख रशीद, अश्विन हेब्बार, एसडीएनवी प्रसाद, वाय संदीप, सौरभ कुमार, बी विनय कुमार, टी विनय, जे साकेत राम, सीआर ज्ञानेश्वर, सीएच संदीप, एम धनुष, सीएच स्टीफन, पीव्ही सत्यनारायण राजू, केएसएन राजू
advertisement
दिल्लीची टीम
ऋषभ पंत (कर्णधार), आयुष बदोनी (उपकर्णधार), विराट कोहली, अर्पित राणा, आयुष दोसेजा, दिवीज मेहरा, हर्ष त्यागी, रितीक शौकीन, इशांत शर्मा, नवदीप सैनी, नितीश राणा, प्रियांश आर्या, प्रिन्स यादव, रोहन राणा, सार्थक रंजन, सिमरजीत सिंग, तेजस्वी दहिया, वैभव कांडपाल, विराट कोहली, यश ढूल, अनुज रावत (स्टँड बाय)
मॅच कुठे लाईव्ह दिसणार?
advertisement
आंध्र प्रदेश विरुद्ध दिल्लीचा हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येईल.
लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे?
मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग जियोहॉटस्टार ऍप आणि वेबसाईटवर होईल.
view commentsLocation :
Bangalore,Karnataka
First Published :
Dec 23, 2025 8:01 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Virat Kohli : विराट कोहली उद्या धमाका करणार! विजय हजारे ट्रॉफीची Live मॅच कधी-कुठे पाहाल?










