वर्ध्यात मिनी IPL चा थरार, WPL मधून ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठी संधी, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
वर्ध्यातील स्वावलंबी मैदानात डब्ल्यूपीएल (WPL)चे हे उत्साहमय सामने रंगत आहेत.
वर्धा, 20 नोव्हेंबर: संपूर्ण भारतभरात करोडो क्रिकेटप्रेमी आहेत. त्यात मोठ्या संख्येने क्रिकेटपटू देखील आहेत. क्रिकेट खेळण्यासाठी अनेक जण उत्साहीत असतात. विशेषतः मुलांमध्ये क्रिकेटचं वेगळंच आकर्षण असतं. त्यामुळे गल्लोगल्ली मुले क्रिकेट खेळताना दिसून येतात. अशाच मुलांना क्रिकेटचा एक हक्काचा मंच मिळावा यासाठी वर्धा येथील काही वरिष्ठ खेळाडूंनी एकत्रित येत वर्धा प्रीमियर लीग सुरू केलं आहे. तेव्हापासून वर्ध्याच्या स्वावलंबी मैदानावर या मिनी आयपीएलचा थरार वर्धेकरांना अनुभवण्यास मिळतोय. तर ग्रामीण खेळाडूंनाही मोठी संधी निर्मा झालीय.
तळागाळातील खेळाडूंना संधी
वर्धा जिल्ह्याच्या तळागाळातील खेळाडूंना मंच किंवा प्रोत्साहनाचं मैदान उपलब्ध व्हावं यासाठी जिल्ह्यातील वरीष्ठ खेळाडूंच्या वतीने वर्धा प्रीमियर लीगची सुरुवात 4 वर्षांपूर्वी झाली. याच मंचातून प्रेरणा घेऊन काही खेळाडू क्रिकेट विश्वात कौतुकास्पद कामगिरी करताना दिसत आहेत. वर्ध्यातील स्वावलंबी मैदानात डब्ल्यूपीएल (WPL)चे हे उत्साहमय सामने रंगत आहेत. येत्या 27 नोव्हेंबरला रात्री 7 वाजता अंतिम सामना रंगणार आहे.
advertisement
सर्व प्रक्रिया आयपीएल प्रमाणे
आयोजकांसह वर्धा प्रीमियर लीगच्या सदस्यांनी खूप मेहनतीने आणि चांगल्या पद्धतीने आयपीएलच्या फॉरमॅट मध्ये ऑक्शन पार पाडले. वर्धा जिल्ह्यातीलच खेळाडू निवडण्यामागे त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा. मोबाईलच्या बाहेर मैदानात क्रिकेट खेळण्याची संधी मिळावी आणि त्यांच्यातील खेळाडूंना जागृत करण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. भविष्यात वर्ध्याच्या बाहेरील जिल्ह्यातील आयकॉन खेळाडूंना देखील यामध्ये घेण्याचा मानस असल्याचं समिती सदस्य अजय पहाडे यांनी सांगितले.
advertisement
या खेळाचा पूर्ण प्लॅटफॉर्म हा आयपीएल बेस्ड असून आयपीएल मध्ये ज्याप्रमाणे फ्रेंचाईज असतात त्याप्रमाणे आम्हालाही ओनर्स सहकार्य करत आहेत. ते ओनर्स आपला संघ निवडतात. या ठिकाणी खेळाडू हे विनामूल्य खेळत नाही तर त्यांचेही मानधन त्यांना मिळतं. दहा ओनर्स असतात आणि हे दहा संघ मालक लाईव्ह ऑक्शन मध्ये आपले संघ निवडतात. यावर्षी पहिल्यांदाच दिवस आणि रात्रकालीन सामने सुरू आहेत. याच मैदानातून अनेक खेळाडू घडले असून ते क्रिकेट विश्वात चांगलं नाव कमावत आहेत, असे वर्धा प्रीमियर लीग समिती सदस्य अजय पहाडे यांनी सांगितलं.
advertisement
अंतिम सामन्यात कोण मारणार बाजी ?
Wpl सिझन 4 मध्ये खेळाडूंच्या चाचणी मध्ये एकूण 270 खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यामधून उत्कृष्ट अशा 150 खेळाडूंची निवड करण्यात आली. वेगवेगळ्या संघाने त्यांचा खेळ बघून पॉइंट्स मध्ये आयपीएलच्या पद्धतीने त्यांचा संघात समावेश केलाय. वर्धा येथील मैदानात साखळी पद्धतीने हे सामने खेळविले जात आहेत. या वर्धा प्रीमियर लीगचे आयोजक सचिन अग्निहोत्री आणि सदस्य आशिष केचे, अजय पहाडे, महेश झाटे, सौरभ इंगोले, भरत पाटील, निलेश नाले, वैभव कवडे आणि इतरांच्या सहकार्याने दहा दिवस हे क्रिकेटचे सामने होतायेत. आता 27 नोव्हेंबरच्या अंतिम सामन्यामध्ये नेमकी कोण बाजी मारणार आणि चमचमता wpl चा चषक कोणत्या संघाकडे जाणार याकडे संपूर्ण वर्धेकरांचे लक्ष लागलं आहे.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
Nov 20, 2023 4:00 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
वर्ध्यात मिनी IPL चा थरार, WPL मधून ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठी संधी, Video








