Cricket Pitch : क्रिकेटची खेळपट्टीची लांबी 22 यार्डच का? 20 किंवा 24 यार्ड का नाही? रुंदीबद्दल काय नियम?
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Why is the cricket pitch only 22 yards : बहुतेक भारतीयांनी कोणत्या ना कोणत्या वयात क्रिकेट खेळले असावे. तुम्ही जरी खेळला नसला तरीही, तुम्हाला माहित असेल की क्रिकेट खेळपट्टीची लांबी 22 यार्ड असते. पण, ती 22 यार्ड का असते 20 किंवा 24 यार्ड का नाही? हे 90 टक्के भारतीयांना माहित नसेल.
मुंबई, 26 सप्टेंबर : भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि पाकिस्तानसह जगभरातील क्रिकेट रसिकांना वर्ल्डकप 2023 चे वेध लागले आहेत. यावेळी क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन भारतात होत आहे. क्रिकेट वर्ल्डकप यशस्वी करण्यासाठी BCCI ने कंबर कसली आहे. भारतात क्रिकेटचं किती वेड आहे, हे वेगळं सांगण्याची गरज आहे. इथे अगदी लहान मुलांनाही क्रिकेटचे सर्व नियम अटी माहीत असतात. त्यामुळे क्रिकेट खेळपट्टीची विकेट ते विकेटपर्यंतची लांबी 22 यार्ड असते हे बहुतेकांना माहीत आहे. मात्र, ही लांबी 22 यार्डच का असते? 20 किंवा 24 यार्ड का नाही? हे 90 टक्के लोकांना माहीत नसेल. तसेच बहुतेक लोकांना क्रिकेट खेळपट्टीची रुंदी किती असते? हे माहित नसेल?
क्रिकेट मैदानाच्या आकाराबाबत कोणताही नियम नाही. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आकाराची मैदाने पाहायला मिळतील. काही मैदानांची सीमा 65 मीटर असू शकते, तर इतरांची 65 ते 75 मीटर असू शकते. बहुतेक ठिकाणी मैदाने गोलाकार किंवा अंडाकृती ठेवली आहेत. पण, अमेरिकेतील क्रिकेट मैदानांचा आकार वेगळा आहे. अर्थात, मैदानाचा आकार वेगळा असू शकतो, परंतु खेळपट्टीचा आकार आयताकृती ठेवला जातो. तसेच आतील वर्तुळ (30 मीटर) गोलाकार ठेवण्याचा नियम आहे. जेथे फील्डची निश्चित लांबी किंवा रुंदी नसते. त्याचवेळी, खेळपट्टीची लांबी आणि रुंदी निश्चित आहे.
advertisement
क्रिकेटमध्ये खेळपट्टी म्हणजे काय?
सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की क्रिकेटमध्ये खेळपट्टी म्हणजे काय? क्रिकेट सामन्यादरम्यान खेळपट्टी हा मैदानाचा केंद्रबिंदू असतो. क्रिकेट खेळपट्टी नियमानुसार आयताकृती ठेवली आहे. त्याची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा खूप जास्त असते. जेव्हा चेंडू फलंदाजाच्या दिशेने फेकला जातो तेव्हा खेळपट्टीच्या सपाट पृष्ठभागामुळे तो उसळतो. गोलंदाजाने खेळपट्टीबाहेर चेंडू टाकला तर तो नो-बॉल ठरतो. त्याचवेळी, खेळपट्टीवर चेंडू दोनदा बाऊन्स झाला तरी तो नो-बॉल घोषित केला जातो.
advertisement

advertisement
खेळपट्टीचे मोजमाप काय आहे?
क्रिकेट खेळपट्टीची स्टंप ते स्टंपपर्यंत लांबी 22 यार्ड किंवा 20.12 मीटर असते. याशिवाय, स्टंपच्या मागे किमान 1.22 मीटर देखील खेळपट्टीमध्ये समाविष्ट मानले जाते. त्याची रुंदी 3.05 मीटर ठेवण्यात आली आहे. क्रिकेटचे नियम अनेकवेळा बदलले गेले आहेत, पण आजतागायत खेळपट्टीचा आकार आणि मोजमाप याबाबतच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, विविध वयोगटातील खेळाडूंसाठी खेळपट्टीचे मापन बदलण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यासाठी मोजमापही निश्चित करण्यात आले आहे.
advertisement
खेळपट्टीची लांबी फक्त 22 यार्ड का आहे?
आता प्रश्न असा पडतो की खेळपट्टीची लांबी केवळ 22 यार्डच का ठेवण्यात आली? ते 20 यार्ड किंवा 24 यार्ड किंवा वेगळी का ठेवू नये? खरेतर क्रिकेट हा वसाहतीचा खेळ आहे आणि त्यात गज सारख्या मोजमापाच्या जुन्या पद्धती वापरल्या जातात. क्रिकेट खेळपट्ट्या मोजण्यासाठी मेट्रिक पद्धतीसह समकालीन मापन पद्धतींचाही वापर केला जात आहे. संपूर्ण ब्रिटीश साम्राज्य मापन पद्धतीमध्ये साखळ्यांचा वापर करत होते. ब्रिटनमध्ये या खेळाचा शोध लागल्यानंतर क्रिकेट खेळपट्टीची लांबी 1 साखळीवर निश्चित करण्यात आली, जी 22 यार्ड इतकी आहे. आता प्रश्न असाही निर्माण होऊ शकतो की खेळपट्टीची लांबी म्हणून एकच साखळी का निवडली गेली. याचे कोणतेही अचूक किंवा वैज्ञानिक उत्तर नाही किंवा ब्रिटीश शाही मोजमाप पद्धतीमध्ये साखळी हे मोजमापाचे सर्वात लहान एकक नाही. पण, क्रिकेट खेळपट्टीसाठी ती आदर्श मानली जात होती.
advertisement
लांबी वेगवेगळ्या ठिकाणी बदलते
नियमांनुसार, क्रिकेट खेळपट्टीची विकेट ते विकेटपर्यंतची लांबी 20.12 मीटर किंवा 66 फूट किंवा 22 यार्ड आहे. त्याच वेळी, खेळपट्टीची क्रीझ ते क्रीज पर्यंतची लांबी 19.3 यार्ड किंवा 17.68 मीटर म्हणजेच 58 फूट आहे. त्याच वेळी, विकेटच्या मागे असलेल्या लांबीसह खेळपट्टीची एकूण लांबी 24.6 यार्ड किंवा 22.56 मीटर म्हणजेच 74 फूट आहे. खेळपट्टीवरील रुंदीच्या दोन पट्ट्यांमधील अंतर 3.3 यार्ड म्हणजे 10 फूट आणि एकूण रुंदी 4 यार्ड म्हणजे 12 फूट आहे.
advertisement

खेळपट्टीची लांबी कधी बदलली होती का?
साधारणपणे क्रिकेट खेळपट्टीची लांबी सारखीच असते. कोणत्याही देशावर किंवा स्टेडियमवर त्याचा प्रभाव नाही. सर्व प्रकारच्या लीगमध्येही यामध्ये कोणतेही बदल करता येत नाहीत. खेळपट्टीच्या लांबीमध्ये खेळाडूंच्या वयोगटानुसार काही बदल केले जाऊ शकतात. 13 वर्षांखालील खेळाडूंसाठी, विकेटमधील खेळपट्टीची लांबी 21 यार्ड ठेवण्यात आली आहे. त्याच वेळी, अंडर-11 साठी, खेळपट्टीची लांबी 19 यार्ड आणि 9 वर्षांखालील स्पर्धेत, खेळपट्टीची लांबी 16 यार्ड ठेवली जाऊ शकते. 15 वर्षांखालील खेळाडूंसाठी, प्रौढ खेळाडूंप्रमाणे, खेळपट्टीची लांबी केवळ 22 यार्ड ठेवण्याचा नियम आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 26, 2023 10:15 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Cricket Pitch : क्रिकेटची खेळपट्टीची लांबी 22 यार्डच का? 20 किंवा 24 यार्ड का नाही? रुंदीबद्दल काय नियम?









