AC Tips : कोणता AC तुमचं जास्त बिल कमी करतो? खरेदी करण्याआधी पाहा ही एक गोष्ट
- Published by:Kranti Kanetkar
- trending desk
Last Updated:
तुम्हीही या उन्हाळ्यात नवीन एसी घेण्याचा विचार करत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती असली पाहिजे.
मुंबई : उन्हाळा सुरू झाला असून वातावरणातील उष्माही चांगलाच वाढला आहे. त्यामुळे लोकांनी एसी, कूलर आणि फॅनची साफसफाई आणि सर्व्हिसिंग करून त्यांचा वापर सुरू केला आहे. काही जणांनी तर नवीन कुलिंग उपकरणांची खरेदी सुरू केली आहे. तुम्हीही या उन्हाळ्यात नवीन एसी घेण्याचा विचार करत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती असली पाहिजे. एअर कंडिशनर घेताना अनेकांच्या प्रश्न पडतो की, कॉपर कॉईल असलेला एसी घ्यावा की अॅल्युमिनियम कॉईल असलेला. यापैकी एक कॉईल निवडण्यापूर्वी दोन्हीचे फायदे आणि तोटे माहिती पाहिजेत, तरच तुम्ही तुमच्या घरासाठी योग्य एसी निवडू शकाल.
कॉपर कॉईल एसीची फायदे आणि तोटे
अॅल्युमिनियम कॉईल एसीच्या तुलनेत कॉपर कॉईल एसी लवकर कूलिंग देतो, हा सर्वात मोठा फायदा आहे. यामुळेच ग्राहकांना आता कॉपर कॉईल असलेल्या एसी मॉडेल्समध्ये टर्बो कूल आणि पॉवर कूल सारखे पर्याय मिळत आहेत. कॉपर कॉईल एसी घरी सहज दुरुस्त करता येतो. या शिवाय या एसीमुळे वीज बचतही होते. कॉपर कॉईल एसीचे काही तोटे देखील आहेत. हे एसी अॅल्युमिनियम कॉईल एसीपेक्षा महाग आणि वजनाला जड असतात.
advertisement
अॅल्युमिनियम कॉईल एसीची फायदे आणि तोटे
कॉपर कॉईल एसीच्या तुलनेत तुम्हाला अॅल्युमिनियम कॉईल एसी खूपच स्वस्त दरात मिळतात. या एसीचे फायदे कमी आणि तोटे जास्त आहेत. अॅल्युमिनियम कॉईल एसीच्या दुरुस्तीमध्ये अडचणी येतात. कारण, अशी एसी मॉडेल्स एकतर बदलावी लागतात किंवा घराऐवजी सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्त करावी लागतात.
कोणता एसी जास्त वीज बचत करतो?
advertisement
समजा, 5 स्टार रेटिंग असलेला अॅल्युमिनियम कॉईल एसी दोन ते तीन वर्षांत 1 स्टार रेटिंगइतकी वीज वाचवतो. कॉपर कॉईल एसी त्याच कालावधीत किमान 3 स्टार रेटिंगइतकी वीज वाचविण्यात मदत करतो.
कोणता एसी खरेदी करायचा? या प्रश्नाचं उत्तर तुमचं बजेट, गरजा आणि प्राधान्यक्रम यावर अवलंबून आहे. जर तुम्हाला दीर्घकाळ टिकणारा एसी पाहिजे असेल आणि आर्थिक अडचण नसेल तर कॉपर कॉईल असलेले एसी खरेदी करणे योग्य ठरेल. एसी किती वीज बचत करेल हे फक्त कॉईलच्या प्रकारावर अवलंबून नाही. एअर फिल्टर आणि कॉम्प्रेसरसारख्या इतर घटकांवर देखील अवलंबून असते. त्यामुळे कोणताही एसी खरेदी करण्यापूर्वी विविध ब्रँड्स आणि मॉडेल्सची तुलना केली पाहिजे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 05, 2024 9:01 AM IST
मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
AC Tips : कोणता AC तुमचं जास्त बिल कमी करतो? खरेदी करण्याआधी पाहा ही एक गोष्ट








