Mobile Phone Under 7000: यापेक्षा स्वस्त आणखी काय पाहिजे? 7000 मध्ये हे आहे दमदार मोबाईल फोन!
- Published by:sachin Salve
Last Updated:
Smartphone under 7K: सात हजार रुपयांपेक्षा कमी किमतीतले फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगल्या ब्रँडचे काही ऑप्शन्स उपलब्ध आहेत.
मुंबई: मोबाइल फोन उत्पादक कंपन्या नवनवीन फोन ग्राहकांच्या गरजा लक्षात ठेवून मार्केटमध्ये आणतात. सात हजार रुपयांपेक्षा कमी किमतीतले फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगल्या ब्रँडचे काही ऑप्शन्स उपलब्ध आहेत. या फोनची नावं, त्यांची फीचर्स, किंमत व ते कुठे खरेदी करता येतील ते जाणून घेऊ या.
लाव्हा O3
लाव्हा हा एक भारतीय ब्रँड असून, तो आपल्या ग्राहकांसाठी उत्तम मॉडेल्स आणतो.
या फोनचा डिस्प्ले 6.75 इंचाचा आहे. त्यात रिफ्रेश रेट 60Hz आहे.
यात ऑक्टा-कोअर प्रोसेसर UNISOC 9863A मिळते. तसंच 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळतं.
यात 13MP एआय कॅमेरा आणि 5 एमपी सेल्फी कॅमेरा मिळतो.
यात टाइप-सी यूएसबी केबलसोबत 10W चार्जिंग आणि 5000mAh क्षमतेची बॅटरी मिळते.
advertisement
हा फोन तुम्ही 6199 रुपयांत अॅमेझॉनवरून घेऊ शकता.
सॅमसंग गॅलॅक्सी M05
हा फोन अॅमेझॉनवर 6499 रुपयांत मिळत आहे.
या फोनमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले असून, तो 20:9 आस्पेक्ट रेशोसह येतो.
यात 50 एमपी हाय रिझॉल्युशन कॅमेरा आणि 8 एमपी फ्रंट कॅमेरा मिळतो.
यात टाइप सीसोबत 25 W फास्ट चार्जिंग आणि 5000mAh ची बॅटरी मिळते.
advertisement
यात ऑक्टा-कोअर मीडियाटेक हेलियो G85 प्रोसेसर असून, यात 8 जीबी रॅम मिळते.
रेडमी A3X
हा फोन अॅमेझॉनवर 6999 रुपयांत मिळतोय.
यात 6.71इंच HD+ 90Hz डिस्प्ले असून, तो कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसोबत येतो.
यात ऑक्टा कोअर प्रोसेसर आणि 3GB व्हर्चुअल रॅम, तसंच 6GB पर्यंत रॅम मिळते.
यात ड्युएल कॅमेरा सिस्टीम आहे. यात 8 एमपी एआय प्रायमरी सेन्सरसोबत कॅमेरा मिळतो.
advertisement
फोनची बॅटरी 5000mAh आहे. बॉक्समध्ये यूएसबी टाइप-C 10W चार्जर मिळतो.
पोको C65
या फोनची अॅमेझॉनवर 6999 रुपये किंमत आहे.
यात 6.74 इंच एचडी+ डिस्प्ले मिळतो.
यात हेलियो G85 प्रोसेसर आहे. तसंच त्यात 4 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज मिळते.
यात ड्युएल कॅमेरा सेटअप आहे. त्यात 50 MP एआय लेन्स व 2MP कॅमेऱ्यासह 8MP फ्रंट कॅमेरा मिळतो.
advertisement
या डिव्हाइसमध्ये 5000mAh बॅटरी मिळते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 14, 2024 11:47 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Mobile Phone Under 7000: यापेक्षा स्वस्त आणखी काय पाहिजे? 7000 मध्ये हे आहे दमदार मोबाईल फोन!








