Google ने रिलीज केला Android 15! या फोन्सला मिळणार अपडेट; भरभरून मिळतील फीचर्स
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Android 15 Update Download: Google ने Android 15 चं स्टेबल व्हर्जन रिलीज केलंय. नेहमीप्रमाणे, हे अपडेट प्रथम Pixel डिव्हाइसेससाठी रिलीझ केले गेले आहे. इतर ब्रँडच्या फोनला या वर्षाच्या अखेरीस लेटेस्ट Android अपडेट मिळेल. Android 15 मध्ये प्रायव्हेट स्पेस आणि आर्काइव ॲप्स सारखी अनेक नवीन फीचर्स जोडली गेली आहेत.
मुंबई : Google ने अधिकृतपणे Android 15 लाँच केले आहे. कंपनीने त्याचं स्टेबल व्हर्जन रिलीज केलं आहे. तथापि, Android 15 सध्या पिक्सेल यूझर्ससाठी जारी करण्यात आला आहे. इतर यूझर्सना काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल. यूझर्सना Android 15 मध्ये अनेक नवीन फीचर्स मिळतील.
कंपनीने या अपडेटमध्ये प्रायव्हेट स्पेसचे फीचर जोडले आहे. जे यूझर्सना स्वतंत्र जागा तयार करण्याचे स्वातंत्र्य देते. यूझर्स त्यांचे सर्व प्रायव्हेट ॲप्स या जागेत ठेवू शकतात. येथे यूझर्स त्यांची माहिती इतर लोकांच्या नजरेपासून सुरक्षित ठेवू शकतात. याव्यतिरिक्त, ऑथेंटिफिकेशनची अॅडिशनल लेयरही मिळते.
advertisement
Android 15 चं अपडेट कोणत्या यूझर्सना मिळेल?
कंपनीने फक्त पिक्सेल यूझर्ससाठी लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम अपडेट जारी केले आहे. Pixel 6 सीरीज – Pixel 6, Pixel 6 Pro आणि Pixel 6a मध्ये नवीन फीचर्सला प्रवेश उपलब्ध असेल. याशिवाय Pixel 7 सीरीज (Pixel 7, Pixel 7 Pro आणि Pixel 7a), Pixel 8 सीरीज (Pixel 8, 8a आणि Pixel 8 Pro), Pixel Fold आणि Pixel Tablet ला उपलब्ध आहेत.
advertisement
याशिवाय लेटेस्ट Pixel 9 सीरीजलाही त्याचा सपोर्ट मिळेल. या सर्व डिव्हाइसेसला OTA द्वारे अपडेट मिळतील. तुम्ही ते Android डेव्हलप वेबसाइटवरून मॅन्युअली डाउनलोड देखील करू शकता.
इतर कोणत्या डिव्हाइसेसना अपडेट मिळेल?
Google ने आधीच कन्फर्म केलं आहे की, Android 15 अपडेट Samsung, iQOO, Nothing, OnePlus, Vivo, Xiaomi, Honor आणि इतर ब्रँडच्या फोनवर उपलब्ध असेल. या ब्रँडच्या फोनला काही काळानंतर स्थिर अपडेट मिळतील.
advertisement
तुम्हाला अनेक नवीन फीचर्स मिळतील
आम्ही Android 15 मध्ये अनेक नवीन फीचर्स पाहायला मिळतील. कंपनी ॲपमधील कॅमेरा कंट्रोल, लो लाइट बूस्ट, HDR हेडरूम कंट्रोल आणि इतर नवीन कॅमेरा फीचर्स देत आहे. यामध्ये तुम्हाला उत्तम AV1 सॉफ्टवेअर डीकोडर, उत्तम पीडीएफ हँडलिंग आणि ग्राफिक्सशी संबंधित अनेक फीचर्स मिळतील.
यूझर्स ॲप्स अर्काइव्ह करून त्यांचा स्पेस फ्री करु शकतील. यासोबतच खासगी जागा तयार करण्याचाही ऑप्शन असेल. Android 15 मध्ये चांगले प्रीव्ह्यू, पिक्चर-इन-पिक्चर, DND नियम, सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी, चांगले NFC आणि वॉलेट यासारख्या अनेक सुधारणा मिळतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 17, 2024 11:20 AM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Google ने रिलीज केला Android 15! या फोन्सला मिळणार अपडेट; भरभरून मिळतील फीचर्स







