चोरांना चुकूनही वापरता यायचा नाही तुमचा iPhone; आजच करा अशी सेटिंग
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
आयफोनमध्ये खास असं एक सेटिंग असतं. हे सेटिंग ऑन केलं तर तुमची समस्या दूर होऊ शकते. हे सेटिंग कसं करायचं, त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.
अॅपलच्या आयफोन युझर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आयफोन दर्जेदार आणि तुलनेनं जास्त सुरक्षित मानले जातात. फोन कोणाताही असला तरी आपला खासगी डेटा आपण त्यात स्टोअर करून ठेवतो. त्यामुळे फोन हरवला किंवा चोरीला गेला तर मोठं नुकसान होऊ शकतं. चोरानं त्याचा गैरवापर केला तर आपल्याला मोठा फटका बसू शकतो. आयफोनमध्ये खास असं एक सेटिंग असतं. हे सेटिंग ऑन केलं तर तुमची समस्या दूर होऊ शकते. हे सेटिंग कसं करायचं, त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.
जर तुम्ही तुमच्या महागड्या आयफोनच्या सुरक्षेबाबत चिंतेत असाल तर आता चिंता करायची गरज नाही. कारण अॅपल कंपनीनं आयफोनमध्ये एक खास फीचर समाविष्ट केलं आहे. हे फीचर अॅक्टिव्हेट केल्यावर चोर तुमचा फोन वापरू शकणार नाही. या नवीन फीचरमुळे तुमचा आयफोन लॉक होईल आणि तुमचा अॅपल आयडी आणि पासवर्डशिवाय तो कोणीही अनलॉक करू शकणार नाही.
advertisement
कोणत्याही थर्डपार्टी ऍप शिवाय वाचा Whatsaap वर डिलिट केलेले मेसेज, कसं? फॉलो करा या स्टेप्स
त्यामुळे आयफोन युझर्सनी हे फीचर अॅक्टिव्हेट करणं गरजेचं आहे. हे फीचर एक्सएस, एक्सआर,एक्सआर प्लस, आयफोन 11, आयफोन 12, आयफोन 13, आयफोन 14 आणि लेटेस्ट आयफोन 15 सीरिजमध्ये वापरता येईल.
हे फीचर अॅक्टिव्हेट करण्यासाठी सर्वप्रथम तुमचा आयफोन कोणत्या व्हर्जनवर काम करतोय हे पाहावं. त्यानंतर तुम्हाला सेटिंग्ज ऑप्शनमध्ये जावं लागेल. तिथं General वर टॅप करावं लागेल. त्यानंतर सॉफ्टवेअर अपडेटवर क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यावर पुन्हा Download and Install Update वर टॅप करावं लागेल. ही प्रोसेस केल्यावर आयफोनची सेटिंग्ज ओपन करावी लागतील. त्यानंतर FaceID & Passcoade किंवा TouchID & Passcode वर टॅप करावं लागेल. टॅप केल्यावर तुम्हाला लगेच पासकोड द्यावा लागेल. मग स्क्रोल डाउन करून Stolen Device Protection फीचर वर टॅप करावं लागेल. त्यानंतर कन्फर्म ऑप्शनवर टॅप करून फीचर टर्न ऑन करावं लागेल. यामुळे तुमचा आयफोन चोरीला गेला तरी तो चोराला वापरता येणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jun 08, 2024 7:06 PM IST







