advertisement

इंस्टाग्राम-यूट्यूबवरुन कशी कमाई करतात क्रिएटर्स? कुठे होते जास्त कमाई? घ्या जाणून

Last Updated:

सध्याच्या काळात जास्तीत जास्त लोक स्मार्टफोन वापरतात. स्मार्टफोन वापरणारे लोक हे हमखास सोशल मीडिया यूज करतात. सोशल मीडियावर व्हिडिओ तयार करुन पैसे कसे मिळतात याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

इंस्टाग्राम यूट्यूब
इंस्टाग्राम यूट्यूब
मुंबई : सध्या सोशल मीडियावर आपण आपला एवढा वेळ घालवतो की, फोन हातात घेतल्यावर दोन-तीन तास कधी निघून गेले हे देखील आपल्याला कळत नाही. आपण रिल्स बघतो पण रिल्स करणारे पैसे कमावत असतात. इंस्टाग्राम आणि यूट्यूब दोन्हींवर व्हिडिओ बनवणारे इन्फ्ल्यूएन्सर्स मोठी कमा करतात. पण ते पैसे कसे कमावतात? त्यांना पैसा कसा मिळतो? तसंच इंस्टाग्रामवर जास्त पैसा मिळतो की यूट्यूबवर याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तुमचेही जास्तीत जास्त फॉलोअर्स असतील तर तुम्हीही पैसा कमावू शकता. चला जाणून घेऊया सोशल मीडियावर कसा पैसा कमावला जातो.

यूट्यूबवर क्रिएटर्स कसे पैसे कमावतात?

जाहिराती : यूट्यूबर्सला व्हिडिओच्या मध्येमध्ये दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातींमधून महसूल मिळत असतो.
सुपरचॅट आणि सुपर स्टिकर्स : या फीचरच्या मदतीने लाइव्ह स्ट्रीमिंगवेळी दर्श हे पसंतीच्या यूट्यूबरला पैसे पाठवू शकतात.
सब्सक्रायबर : चॅनलच्या सब्सक्रायबर्सना एक विशेष सदस्यता सेवा मिळते. त्यामधून अतिरिक्त कंटेंटही पाहता येतो. त्याद्वारे यूट्यूब क्रिएटर्सना महसूल मिळत असतो.
advertisement
स्पॉन्सरशिप : स्पॉन्सरशिपमधून यूट्यूबर्स मोठी कमाई करत असतात. यामध्ये ब्रँड्स आपले प्रोडक्ट्स पणोट करण्यासाठी यूट्यूब क्रिएटर्ससोबत भागीदारी करतात.
इंस्टाग्रामवर कसे मिळतात पैसे?
ब्रँड स्पॉन्सरशिप : ब्रँड्स स्पॉरशिपमधून इंस्टाग्रामवर क्रिएटर चांगले पैसे कमावतात. भरपूर फॉलोर्स असतील तर कंपन्या आपले ब्रँड्सचे प्रमोशन करण्यासाठी क्रिएटर्सना पैसे देतात.
advertisement
एफिलिएट मार्केटिंग : हे पैसे कमावण्याचं उत्तम साधन आहे. यामध्ये इंस्टाग्राम अकाउंटवरुन उत्पादनाचा प्रचार करण्यात येतो. प्रत्येक सेलवर अकाउंटधारकाला कमिशन मिळत असते.
प्रोडक्ट सेलिंग : इंस्टाग्रामवर उपलब्ध असलेल्या शॉपिंग फीचरवर तुम्ही तुमची स्वतःची असलेली उत्पादने देखील विकू शकता.
इंस्टाग्राम लाइव्ह : इंस्टाग्राम लाइव्ह करुनही पैसे कमावता येऊ शकतात. लाइव्ह व्हिडिओच्या दरम्यान लोकं तुम्हाला देणग्या आणि भेट वस्तू देखील पाठवू शकतात.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
इंस्टाग्राम-यूट्यूबवरुन कशी कमाई करतात क्रिएटर्स? कुठे होते जास्त कमाई? घ्या जाणून
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement