500 रुपयांपेक्षा कमीमध्ये Airtel-Jio देतेय 22 आणि OTT प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन, पहा डिटेल्स
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Jio आणि Airtel मध्ये 448 रुपये आणि 449 रुपयांचे प्लॅन येतात. जे कॉलिंग, डेटा, SMS, कॉलरट्यून आणि मोफत OTT प्लॅटफॉर्म (Jio 12, Airtel 22) देतात.
मुंबई : टेलिकॉम कंपन्या त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये कॉलिंग आणि इंटरनेट डेटासह इतर अनेक फायदे देतात. यामध्ये OTT प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिप्शन आणि फ्री कॉलर ट्यून इत्यादींचा समावेश आहे. Jio आणि Airtel देखील असे रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहेत. ज्यामध्ये यूझर्सना कॉलिंग, डेटा, एसएमएस, कॉलरट्यून आणि फ्री OTT प्लॅटफॉर्मवर अॅक्सेस मिळत आहे. दोन्ही कंपन्यांच्या समान रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेऊया.
जिओचा 448 रुपयांचा प्लॅन
28 दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या या प्लॅनमध्ये डेली 2GB हायस्पीड डेटा मिळतो. अशा प्रकारे 28 दिवसांत एकूण 56GB डेटा मिळेल. पात्र यूझर्सना अनलिमिटेड 5G डेटा देखील मिळेल. या प्लॅनमध्ये दररोज 100 फ्री एसएमएस आणि अनलिमिटेड मोफत व्हॉइस कॉलिंगचाही समावेश आहे.
advertisement
12 OTT ॲप्समध्ये प्रवेश देखील समाविष्ट आहे
या प्लॅनसह, कंपनी Jio TV ॲपद्वारे Jio Cinema Premium, Sony Liv, Zee5, Liongate, Discovery Plus, Sun Next, Kanchha Lanka, Planet Marathi, Chaupal, Fancode आणि Hoichoi इत्यादींचे फ्री सबस्क्रिप्शन देखील देत आहे. या प्लॅनमध्ये यूझर्सना Jio Cloud मध्ये फ्री अॅक्सेस देखील मिळेल.
एअरटेलचा 449 रुपयांचा प्लॅन
जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल 449 रुपयांचा रिचार्ज प्लॅन देखील ऑफर करत आहे. या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा दिला जात आहे. म्हणजेच या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह एकूण 84GB डेटा मिळेल. Jio प्रमाणे, Airtel देखील या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा देत आहे. प्लॅनच्या इतर फायद्यांमध्ये दररोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड फ्री कॉलिंग यांचा समावेश आहे. देशात कुठेही कॉल करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
advertisement
YouTube वर काय पाहायचं, तुम्हीही आहात कन्फ्युज? तर युट्यूबने आणलंय हे नवं फीचर, जाणून घ्या वैशिष्ट्य
एअरटेल 22 OTT ला अॅक्सेस देत आहे
कंपनी या प्लॅनसह Airtel Extreme Play Premium चे सबस्क्रिप्शन ऑफर करत आहे. ज्यामध्ये Sony Liv, Chaupal आणि Sun Next सह 22 OTT प्लॅटफॉर्मवरील कंटेंट पाहिली जाऊ शकतो. ही सब्सक्रिप्शन 28 दिवसांसाठी व्हॅलिड असेल. याशिवाय या प्लॅनमध्ये HelloTunes एक महिन्यासाठी फ्री उपलब्ध आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 28, 2024 3:30 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
500 रुपयांपेक्षा कमीमध्ये Airtel-Jio देतेय 22 आणि OTT प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन, पहा डिटेल्स










