WhatsApp वर येतंय नवं सेफ्टी फीचर! सायबर अटॅकपाहून सहज होईल बचाव
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
WhatsApp आपल्या यूझर्सना सायबर हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी एक नवीन फीचर आणण्याची तयारी करत आहे. हे फीचर एकाच टॅपने सर्व प्रायव्हसी आणि सिक्योरिटी सेटिंग्ज लागू करेल.
मुंबई : WhatsApp आपल्या यूझर्सना सायबर हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी एक नवीन सेटिंग आणत आहे. ते अॅपची अनेक फीचर्स लॉक करेल. ज्यामुळे सायबर गुन्हेगारांना यूझरची माहिती अॅक्सेस करण्यापासून रोखले जाईल. हे फीचर अँड्रॉइडच्या बीटा व्हर्जनमध्ये दिसले आहे. या नवीन फीचरने, अज्ञात नंबरवरून येणाऱ्या मेसेजची संख्या देखील लिमिटेड होईल, ज्यामुळे यूझर्सना नको असलेले आणि स्पॅम मेसेज टाळण्यास मदत होईल.
स्ट्रिक्ट अकाउंट सेटिंग्ज मोड व्हॉट्सअॅपमध्ये येत आहे
या नवीन फीचरला स्ट्रिक्ट अकाउंट सेटिंग्ज मोड म्हणतात. कंपनी सध्या या फीचरवर काम करत आहे आणि ते यूझर्ससाठी रोल आउट होण्यास काही वेळ लागू शकतो. या फीचरसह, अॅपमधील सर्व सुरक्षा सेटिंग्ज एकाच टॉगलने लागू करता येतील. यामुळे यूझर्सना वेगवेगळे प्रायव्हसी ऑप्शन आणि सेटिंग्ज सेट करण्याची गरज दूर होईल. हा मोड अॅक्टिव्ह केल्याने यूझर्सचा आयपी अॅड्रेस संरक्षित होईल. ज्यामुळे कोणीही लोकेशन डेटाच्या आधारे यूझर्सला ट्रॅकही करु शकणार नाही.
advertisement
अज्ञात लोकांकडील फाइल्स डाउनलोड केल्या जाणार नाहीत
नवीन फीचरमध्ये ही सेटिंग अॅक्टिव्ह केल्यानंतर, अज्ञात नंबरवरील फाइल्स, फोटो आणि व्हिडिओ ब्लॉक केले जातील. ज्यामुळे डिव्हाइसवर मालवेअर इंस्टॉल होण्याचा धोका टाळता येईल. यूझर्सना फक्त अज्ञात नंबरवरूनच टेक्स्ट मेसेज प्राप्त होतील. कंपनी लिंक प्रिव्ह्यू डिसेबल करण्याचा देखील विचार करत आहे.
advertisement
अज्ञात नंबरवरून येणारे कॉल म्यूट केले जातील
नवीन फीचरमध्ये स्पॅम, स्कॅम आणि झिरो-क्लिक हल्ल्यांपासून यूझर्सचे संरक्षण करण्यासाठी अज्ञात नंबरवरून येणारे कॉल म्यूट करण्याचा पर्याय देखील समाविष्ट असेल. शिवाय, यूझर्सचे फोटो, स्टेटस आणि लास्ट सीन यासारखी माहिती त्यांच्या संपर्कांव्यतिरिक्त इतर कोणालाही दिसणार नाही. अशा प्रकारे, सर्व प्रायव्हसी आणि सिक्योरिटी सेटिंग्ज एकाच टॉगलने अॅक्टिव्ह केल्या जाऊ शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2025 4:38 PM IST


