advertisement

Whatsapp वर चॅटिंग करण्यासाठी नंबर शेअर करण्याची गरज नाही?

Last Updated:

. इन्स्टाग्रामसारख्या या फीचरच्या मदतीने युझर्सना आणखी प्रायव्हसी मिळेल आणि पर्सनल नंबर शेअर करावा लागणार नाही. याविषयी अधिक जाणून घेऊ या.

नंबर शेअर न करता आता गप्पा मारता येणार
नंबर शेअर न करता आता गप्पा मारता येणार
मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप हे लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. कारण त्यात युझर्सच्या गरजांचा विचार करून वेळोवेळी नवनवी फीचर्स दिली जातात. आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर आणखी एक नवं फीचर येणार आहे. सध्या कोणाही व्यक्तीचा फोन नंबर आपल्याकडे असल्याशिवाय त्या व्यक्तीशी व्हॉट्सअ‍ॅपवरून संवाद साधता येत नाही; मात्र आता लवकरच युझरनेमच्या साह्याने व्हॉट्सअ‍ॅपवरून चॅटिंग करता येणार आहे. इन्स्टाग्रामसारख्या या फीचरच्या मदतीने युझर्सना आणखी प्रायव्हसी मिळेल आणि पर्सनल नंबर शेअर करावा लागणार नाही. याविषयी अधिक जाणून घेऊ या.
'डब्ल्यूएबीटाइन्फो'वर व्हॉट्सअ‍ॅपवर येणार असलेल्या अपडेट्ससंदर्भातली माहिती प्रसिद्ध केली जाते. त्यातच याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. युझरनेमच्या संदर्भातला बदल व्हॉट्सअ‍ॅपच्या अँड्रॉइड बेटा व्हर्जनमध्ये दिसला आहे. त्याशिवाय आयओएसच्या बेटा व्हर्जनमध्येही निवडक टेस्टर्सना हा अपडेट उपलब्ध करून दिला जात आहे. या फीचरच्या साह्याने युझर्सना त्यांचं युझरनेम सेट करता येईल. ते युझरनेम इतरांशी शेअर करता येईल.
advertisement
डब्ल्यूएबीटाइन्फो या पोर्टलवर एक स्क्रीनशॉटही शेअर करण्यात आला आहे. हा नवा पर्याय कुठे उपलब्ध असेल, हेही त्यावरून कळलं आहे. युझर्सना युझरनेम सेट करण्याचा ऑप्शन अ‍ॅपच्या प्रोफाइल सेक्शनमध्ये दिला जाईल. अल्फाबेट्स, नंबर्स आणि स्पेशल कॅरेक्टर्सच्या साह्याने युझरनेम निश्चित करता येऊ शकेल. साहजिकच प्रत्येक युझरनेम युनिक असेल. म्हणजेच एकाने वापरलेलं युझरनेम दुसऱ्या व्यक्तीला वापरता येणार नाही.
advertisement
कोणाबरोबर चॅटिंग सुरू करायचं असेल, तर केवळ युझरनेमच्या साह्याने ते सुरू करता येईल. तसं केल्यामुळे त्या व्यक्तीचा पर्सनल नंबर गुप्त राहील. फोन नंबर शेअर करायचा आहे की गुप्त ठेवायचा आहे हे प्रत्येकाने ठरवायचं आहे आणि त्यानुसार सेटिंग करायचं आहे. अन्य व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सप्रमाणेच युझरनेमच्या साह्याने सुरू केलेली चॅट्सही एंड टू एंड एन्क्रिप्टेड असतील. बेटा टेस्टिंगनंतर हे फीचर सर्व युझर्सना उपलब्ध करून दिलं जाऊ शकतं.
advertisement
या फीचरचा सर्वांत मोठा उपयोग हा होईल, की एखाद्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये समाविष्ट झाल्यानंतर आपला नंबर कोणालाही कळणार नाही. त्यामुळे त्याचा गैरवापर केला जाणार नाही. कारण अन्य ग्रुप मेंबर्सना केवल युझरनेम दिसेल. युझरनेमच्या साह्याने केवळ व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करता येऊ शकतो; मात्र फोन नंबर कोणाच्या हाती लागला, तर युझर्सना अननोन नंबर्सवरून कॉल्सही येतात. ती भीती युझरनेमच्या वापराने कमी होऊ शकेल.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
Whatsapp वर चॅटिंग करण्यासाठी नंबर शेअर करण्याची गरज नाही?
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement