Bhiwandi Crime : बापाच्या भांडणाचा राग मुलावर काढला; भंडाऱ्याच्या कार्यक्रमात तरुणावर सपासप वार
Last Updated:
Bhiwandi Crime : राग व्यक्तीला कोणतेही टोक गाठण्यास भाग पाडू शकतो ते एकदा भिवंडीतील घटनेने समोर आलेले आहे. जिथे एका जून्या वादातून तरुणासोबत भयान प्रकार केलेला आहे.
भिवंडी : भिवंडी शहरात वारंवार गुन्हेगारीच्या घटना वाढत असून एक तरुणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यात पुन्हा एकदा भिवंडीत एक धक्कादायक घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार भिवंडीतील पद्मानगर येथे सोमवारी रात्री घडला आहेत. जिथे काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून ओळखीच्या व्यक्तीने तरुणावर चाकू हल्ला केलेला आहे. या अचानक आणि रात्री घडलेल्या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
वडिलांशी भांडण भोवलं मुलाला
जगदीश जवारलाल केशरवाणी (वय 55) असे आरोपीचे नाव असून आकाश रामकुमार केशरवाणी (वय 31) हा तरुण या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. काही महिन्यांपूर्वी जगदीश आणि आकाशच्या वडिलांमध्ये वाद झाला होता. त्या भांडणाचा राग मनात धरून जगदीशने आकाशवर सूड उगवला अशी प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
advertisement
सोमवारी रात्री सुमारे सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास पद्मानगर येथे शंकर महादेवाच्या भंडाऱ्याचा कार्यक्रम सुरू होता. त्या वेळी आकाश गाणे ऐकत उभा असताना जगदीश तेथे आला. त्याने पहिल्यांदा आकाशला शिवीगाळ केली आणि त्यानंतर मारहाण करत चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात आकाश गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आकाशच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 25, 2026 11:46 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Bhiwandi Crime : बापाच्या भांडणाचा राग मुलावर काढला; भंडाऱ्याच्या कार्यक्रमात तरुणावर सपासप वार







