Thane Coastal Road: अपघात अन् वाहतूक कोंडीतून ठाणेकरांची सुटका! गेमचेंजर प्रकल्पाच्या कामाला वेग, डेडलाईन कधीची?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Thane Coastal Road: आता ठाण्यात खाडी किनारा प्रकल्प सुरू असून याच्या कामाला वेग आला आहे. यात पहिल्या टप्प्यात खारेगाव ते गायमुख काम होत आहे.
ठाणे: ठाणे-मुंबई परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (MMRDA) मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. आता ठाण्यात खाडी किनारा प्रकल्प सुरू असून याच्या कामाला वेग आला आहे. यात पहिल्या टप्प्यात खारेगाव ते गायमुख काम होत असून आतापर्यंत पायाभरणीचे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे.
ठाणे कोस्टल रोड प्रकल्पाचे काम दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात खारेगाव ते गायमुख दरम्यान काम असून या कामाला वेग आला आहे. हा टप्पा 13.45 किलोमीटरचा असून डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. आता यातील 50 टक्के काम पूर्ण झाले असून पिअर कॅप, तुळई उभारण्याचे काम सुरू आहे. तर दुसरा टप्पा हा बाळकुम आनंदनगर असून त्याची लांबी 7 किलोमीटर असेल.
advertisement
कसा आहे प्रकल्प?
ठाणे खाडी किनारा मार्ग हा विविध महत्त्वाच्या प्रकल्पांना जोडण्यात येणार आहे. यामध्ये ठाणे वर्तुळाकार मेट्रो, साकेत - आमणे उन्नत मार्ग, कासारवडवली- खारबाव मार्ग अशा विविध प्रकल्पांशी कोस्टल रोड जोडला जाईल. हा 2700 कोटी रुपयांचा प्रकल्प असून यामध्ये खारेगाव ते गायमुख सहा पदरी मार्ग असेल. या पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. तर बाळकुम ते आनंदनगर या ठाणे खाडी किनारी मार्ग-2 कामाचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Feb 14, 2026 12:03 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Thane Coastal Road: अपघात अन् वाहतूक कोंडीतून ठाणेकरांची सुटका! गेमचेंजर प्रकल्पाच्या कामाला वेग, डेडलाईन कधीची?








