नववर्षाच्या पूर्वसंध्येला तलाव पाळीवर गंगा आरतीचे आयोजन, ठाणेकरांचं सेलिब्रेशन भक्तीमय वातावरणात
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Thanekar New Year Ganga Aarti Talaopali: ठाणेकर 2025 या सरत्या वर्षाला निरोप आणि 2026 वर्षाचं स्वागत भक्तीमय वातावरणात करणार आहे. ठाण्यातील सुप्रसिद्ध ठिकाण असलेल्या तलाव पाळी येथे गंगा आरती करून ठाणेकर नवीन वर्षाचं स्वागत करणार आहेत.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकदा लोकं पार्टी वैगेरेसाठी जात असतात. धम्माल मस्ती करत सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत जल्लोषात करत असतात. मात्र ठाणेकर 2025 या सरत्या वर्षाला निरोप आणि 2026 वर्षाचं स्वागत भक्तीमय वातावरणात करणार आहे. ठाण्यातील सुप्रसिद्ध ठिकाण असलेल्या तलाव पाळी येथे गंगा आरती करून ठाणेकर नवीन वर्षाचं स्वागत करणार आहेत. कदाचित पहिल्यांदाच धार्मिक पद्धतीने ठाण्यामध्ये नवीन वर्षाचं स्वागत केलं जाणार आहे. श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.
31 डिसेंबरच्या रात्री ठाण्याच्या तलाव पाळीच्या काठावर गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे फटाक्यांच्या आतषबाजी आणि गोंगाटाऐवजी मंत्रोच्चार, दिव्यांचा प्रकाश आणि भक्तीभावात ठाणेकरांना 2025 या सरत्या वर्षाला निरोप देत, 2026 या नववर्षाचे स्वागत करण्याची संधी मिळणार आहे. सगळीकडेच फटाक्यांची आतषबाजी, गोंगाट, पार्टी आणि डान्स यामध्ये सरत्या वर्षाला निरोप देत, नवीन वर्षाचं स्वागत जल्लोषात केलं जातं. पण मात्र ठाण्यात धार्मिक पद्धतीने आणि पहिल्यांदाच थोड्या वेगळ्या पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत केलं जाणार आहे. अनेक ठिकाणी गंगा आरतीचं आयोजन केलं जातं.
advertisement
ठाण्याच्या श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले जाते. शहरात स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येते. यंदा या यात्रेचे 26 वे वर्ष आहे. दरवर्षी गुढीपाडव्याच्या पूर्व संध्येला तलाव पाळीजवळ दीपोत्सव आणि तलावाच्या काठावर गंगा आरती करण्याची परंपरा आहे. 31 डिसेंबरच्या रात्री 10:30 वाजता आरती सुरू होणार असून मध्यरात्री 12:01 वाजेपर्यंत ही आरती चालेल. मिळालेल्या माहितीनुसार, तलावपाळी येथे भाविकांना काशी- हरिद्वारसारखा आध्यात्मिक अनुभव देण्यासाठी पारंपारिक विधी आणि मंत्रोच्चार वापरून गंगा आरती करण्यासाठी वाराणसीतील अनुभवी पंडितांना खास आमंत्रित करण्यात येणार आहे.
advertisement
दरम्यान, अनेक मुंबईकरांनी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या उत्सवाचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन (FDA) हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट्स, बेकरी आणि स्पेशल फेस्टिव्ह फुड विकणाऱ्या दुकानांची राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन चौकशी करण्याची शक्यता आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सणासुदीच्या काळात नागरिकांना चांगल्या दर्जाचे आणि भेसळमुक्त अन्न मिळेल याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. यावर्षी, FDA ची विशेष मोहिम केवळ नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला फक्त हॉटेलवरच नाही तर, ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे केक, मिठाई आणि स्नॅक्स तयार करणाऱ्या बेकरी आणि अन्न दुकानांना देखील लक्ष्य करणार आहे.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 4:07 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
नववर्षाच्या पूर्वसंध्येला तलाव पाळीवर गंगा आरतीचे आयोजन, ठाणेकरांचं सेलिब्रेशन भक्तीमय वातावरणात











