थालपीठ हा पश्चिम भारत आणि उत्तर कर्नाटकातील लोकप्रिय पदार्थ आहे. महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीतील हा एक महत्त्वाचा पदार्थ आहे. तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारीचे पीठ आणि बेसनापासून पौष्टिक असे थालीपीठ बनवले जाते. चविला स्वादिष्ट असणारे थालीपीठ कोणत्याही चटणी किंवा करीशिवाय सर्व्ह केले जाऊ शकते. परंतु लोणी आणि दह्याबरोबर छान लागते. बीडमधीलगृहिणी मंजुषा कुलकर्णी यांच्याकडून आपण थालीपीठची रेसिपी जाणून घेणार आहोत.



