पुणेकरांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग असलेला वडापाव आता एका ऐतिहासिक ठिकाणी वेगळ्या ओळखीने मिळत आहे. पुण्याच्या नारायण पेठेतील १३५ वर्षे जुन्या 'निघोजकर वाड्यात' मिळणाऱ्या गरमागरम वडापावने खवय्यांना भुरळ घातली आहे. विशेष म्हणजे, सोनाली आणि संदीप बोंदार्डे हे दाम्पत्य दिवसा खाजगी कंपनीत नोकरी करून संध्याकाळी ५:३० ते ८:३० या वेळेत हा व्यवसाय चालवतात. ज्या वाड्यात कधी काळी निळू फुले आणि श्रीराम लागू यांसारखे दिग्गज येत असत, तिथे आजही नाटकांच्या सरावांसोबतच खमंग वडापावचा आस्वाद घेतला जातोय.
Last Updated: Dec 18, 2025, 19:58 IST


