कोल्हापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापुरातील जयसिंगपुर पोलीस ठाण्यासमोरच दोन गटात जोरदार हाणामारी झाली आहे. गावातील वाद घेवून दोन गट पोलीस ठाण्यात आले होते. पण ते आमनेसामने आल्यावर त्यांच्यात हाणामारी झाली.हाणामारीत एकमेकांना उचलून आपटलं.दोन्ही गटातील लोकं जखमी झाली आहेत.दोनही गट खूपच आक्रमक झाले होते. पोलीसांनी मध्यस्थी करत ही हाणामारी सोडवण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी या दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केले आहेत.या वादाचे कारण अस्पष्ट आहे.
Last Updated: Dec 26, 2025, 16:22 IST


