पुण्याच्या कोरेगाव भिमामध्ये एका २७ वर्षीय पश्चिम बंगालच्या तरुणाचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपशासित राज्यात बंगाली नागरिकांवर हल्ले होत असल्याचा आरोप केला होता. पण, पुणे पोलिसांनी याा प्रकरणी तपास केला असता या तरुणाच्या हत्येचं मुळ कारण समोर आलं आहे.'सुखन महतो आणि त्याच्या मित्राचे दारू पिल्यानंतर काही स्थानिक तरूणांसोबत वाद झाले होते.. त्यानंतर या वादावादीचं पर्यवसन हाणामारीत झालं आणि महतो याचा खून झाल्याचं प्रथमदर्शनी तपासात समोर आलंय, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी दिली.



