पिंपरी चिंचवड: जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या पीव्हीआर (PVR) सिनेमाच्या इमारतीला आज सायंकाळी ६:१५ च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचे स्वरूप पाहून परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या आत वेल्डिंगचे काम सुरू होते. यावेळी झालेल्या स्पार्किंगमुळे (Sparking) बांबूंनी पेट घेतला आणि आगीने रौद्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या भीषण आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र, भररस्त्यात आणि वर्दळीच्या ठिकाणी लागलेल्या या आगीमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
Last Updated: Dec 23, 2025, 19:01 IST


