पुणे: विविध उद्योगांना एका ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून देणारी भीमथडी जत्रा सध्या पुण्यात सुरू आहे. पुण्यातील या जत्रेमुळे केवळ खाद्य आणि वस्त्र उद्योगालाच नव्हे तर ग्रामीण संस्कृती, लोककला आणि महिला उद्योजकतेलाही चालना मिळत आहे. या जत्रेमध्ये राज्यभरातील अनेक महिला बचत गट सहभागी झाले असून, त्यांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत आहे. याच भीमथडी जत्रेमध्ये पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमधील दुर्गामाता महिला बचत गटाने सादर केलेल्या हँडमेड गोधड्यांनी विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
Last Updated: Dec 24, 2025, 18:01 IST


