Sugar Vs Jaggery Tea : साखरेऐवजी गूळ टाकला म्हणजे चहा हेल्दी होतो का? डॉक्टर काय सांगतात
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आपल्याला वाटतं की गुळाचा चहा म्हणजे अगदी अमृतच आपण अगदी अभिमानाने सांगतो, मी साखर घेत नाही, गुळाचा चहा पितो/पिते. पण तसं नाही, हा तुमचा गैरसमज आहे.
सकाळची सुरुवात चहाच्या कपाशिवाय होऊच शकत नाही, खरं ना? अनेकांसाठी तर सकाळचा चहा मिस झाला तर मग दिवस खराब जातो. पण आजकाल फिट राहण्याच्या नादात लोक चहा पिण्याच्या पद्धतीत बरेच बदल करत आहेत. साखर आरोग्याला वाईट असते म्हणून आपल्यापैकी अनेकांनी चहातून साखर हद्दपार केली आणि त्याची जागा घेतली गुळाने. आपल्याला वाटतं की गुळाचा चहा म्हणजे अगदी अमृतच आपण अगदी अभिमानाने सांगतो, मी साखर घेत नाही, गुळाचा चहा पितो/पिते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
डॉक्टर काय सांगतात?1. कॅलरीजचा हिशोब: एक चमचा साखरेत जेवढी ऊर्जा असते, जवळपास तितकीच एक चमचा गुळातही असते. त्यामुळे जर तुम्ही मधुमेही (Diabetic) असाल, तर गुळाचा चहाही तुमच्या रक्तातील साखर वाढवू शकतो.2. पचनशक्ती आणि गूळ: आयुर्वेदानुसार, गुळामुळे पचन सुधारतं आणि शरीराला थोडी उष्णता मिळते. हिवाळ्यात गुळाचा चहा घेणं एकवेळ ठीक आहे, पण उन्हाळ्यात तो अतिप्रमाणात घेतल्यास नाकातून रक्त येणे किंवा उष्णतेचे त्रास होऊ शकतात.3. दुधासोबतचं कॉम्बिनेशन: आपण अनेकदा चहा उकळतानाच त्यात गूळ टाकतो, ज्यामुळे चहा फुटतो. पण दुधासोबत गूळ एकत्र करणं हे आयुर्वेदानुसार 'विरुद्ध आहार' मानलं जातं, ज्यामुळे काहींना त्वचेचे विकार किंवा पोटाचे त्रास होऊ शकतात.
advertisement
गुळाचा चहा पिणाऱ्यांनी 'या' गोष्टी लक्षात ठेवाव्याजर तुम्ही फिट राहण्यासाठी गुळाचा चहा घेत असाल, तर लक्षात ठेवा की अतिप्रमाण नेहमीच वाईट असतं.गुळाचा चहा बनवताना आधी चहा उकळून घ्या आणि कपामध्ये चहा गाळल्यानंतर वरून गूळ टाका, यामुळे चहा फुटत नाही आणि गुळाचे गुणधर्म टिकून राहतात.जर तुम्हाला मधुमेह असेल, तर गुळाचा चहा घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
advertisement
advertisement









