राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना आज विधानभवनाच्या पोर्चमध्ये एका धक्कादायक घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शिवसेना UBT चे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव आणि भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात रंगात आलेली शाब्दिक चकमक सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.



