इराणनंतर इस्त्रायलचा आणखी एका देशावर हल्ला, ऑपरेशनल ब्लॅक फ्लॅग ॲक्टीव्ह, 3 बंदरं उडवली
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Israel Attack on Yemen : इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर इस्त्रायलने आणखी एका देशावर हल्ला केला आहे.
Israel Attack on Yemen : पॅलेस्टाईनवरील हल्ल्यानंतर इस्रायलने इराणवर हल्ला केला होता. आता इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्धबंदीची घोषणा झाली असून दोन्ही देशांनी सीजफायरचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता इस्रायलने आणखी एका नवीन देशावर हल्ला केला आहे. इस्रायलने ज्या देशावर हल्ला केला आहे तो देश येमेन आहे. इस्रायलने येमेनच्या हुथी बंडखोरांना लक्ष्य केलं आहे. त्यामुळे मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. इस्रायलने 'ऑपरेशन ब्लॅक फ्लॅग'द्वारे येमेनच्या पश्चिम भागात असलेल्या तीन प्रमुख बंदरांवर हल्ला केला. इस्रायली हवाई दलाने हुदायदाह, रास इसा आणि सैफ अशा तीन बंदरांवर हा मोठा हवाई हल्ला केला. यापूर्वी इस्रायलने इराणच्या अणुस्थळांना लक्ष्य केले होते.
हल्ल्यापूर्वी इस्रायलने या भागातील नागरिकांना हा परिसर रिकामा करून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा इशारा दिला होता. त्यांना सांगण्यात आले होते की इस्रायली हवाई दल कधीही हल्ला करू शकते. इशाऱ्याच्या काही तासांतच हवाई हल्ले सुरू झाले. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी हल्ल्यांना दुजोरा दिला आहे. 'हुथींनी कोणतीही कारवाई केली तरी त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. येमेनची अवस्था इराणसारखीच असेल. जो कोणी इस्रायलविरुद्ध हात उचलेल त्याचा हात कापला जाईल,' असा इशाराही संरक्षण मंत्र्यांनी दिला.
advertisement
इस्रायलने येमेनवर हल्ला का केला?
इस्रायल डिफेन्स फोर्स (IDF) ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या एका पोस्टमध्ये हल्ल्याचे कारण स्पष्ट केले. IDF चा दावा आहे की, हुथी बंडखोर इराणकडून शस्त्रे आयात करून इस्रायल आणि त्याच्या मित्र राष्ट्रांविरुद्ध दहशतवादी कट रचत होते. इब आणि तैझ शहरांना वीजपुरवठा करणाऱ्या हुथी-नियंत्रित पॉवर स्टेशन 'रस कनातिब' लाही या हल्ल्यात उद्ध्वस्त करण्यात आले.
advertisement
गुप्तचर माहितीच्या आधारे इस्रायली हवाई दलाने (IAF) येमेनमधील अल हुदायदाह, रास इसा, सलिफ आणि रास कनातिब पॉवर प्लांटमधील हुथी दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या तळांचा वापर इराणी शस्त्रे हस्तांतरित करण्यासाठी आणि ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी इस्रायली नागरिकांवर हल्ला करण्यासाठी केला जात होता. या हल्ल्यांमध्ये 'गॅलेक्सी लीडर' जहाजालाही लक्ष्य करण्यात आले होते, जे २०२३ मध्ये हुथींनी ताब्यात घेतले होते आणि आंतरराष्ट्रीय जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यात रडार सिस्टम बसवण्यात आली होती. IDF ने म्हटले आहे की ते इस्रायली नागरिकांना धोका टाळण्यासाठी आवश्यक तेथे कारवाई करत राहील.
advertisement
इस्त्रायलच्या हल्ल्याला हुथीचा दुजोरा
हुथी बंडखोरांशी संबंधित माध्यमांनी हल्ल्याची पुष्टी केली आहे. परंतु त्यांनी फक्त हुदायदाह बंदरावर हल्ला केल्याचे कबूल केले आहे. याशिवाय हल्ल्यात झालेल्या नुकसानाबद्दल किंवा जीवितहानीबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. वृत्तसंस्था रॉयटर्सनुसार, हुथी बंडखोरांचा दावा आहे की इस्रायली हल्ल्यानंतर त्यांची हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय झाली आणि त्यांनी हल्ल्यांना क्षेपणास्त्रांनी प्रत्युत्तर दिले.
view commentsLocation :
Delhi
First Published :
July 07, 2025 6:49 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
इराणनंतर इस्त्रायलचा आणखी एका देशावर हल्ला, ऑपरेशनल ब्लॅक फ्लॅग ॲक्टीव्ह, 3 बंदरं उडवली


