Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला काय झालं? हॉस्पिटलमध्ये कधीपासून?
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
दाऊद इब्राहिमची प्रकृती विषबाधेमुळे बिघडली की त्यामागे आणखी काही कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
नवी दिल्ली, 18 डिसेंबर : अंडरवर्ल्ड डॉन आणि भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार दाऊद इब्राहिम आपल्या शेवटच्या घटका मोजत असल्याचं वृत्त समोर आलं आहे. दाऊद सध्या पाकिस्तानमध्ये लपून बसलेला आहे. तिथे त्याच्यावर कोणीतरी विषप्रयोग केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याची प्रकृती बिघडली असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दाऊद इब्राहिमला गेल्या दोन दिवसांपासून कराचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे रुग्णालयात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दाऊदला कोणीतरी विष दिल्याचा दावा केला जात असला तरी अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सोशल मीडियावर दाऊदबाबतच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यानुसार विविध प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दाऊद इब्राहिमच्या प्रकृतीबाबत सोमवारी माहिती समोर आली असली तरी गेल्या दोन दिवसांपासून तो रुग्णालयात दाखल असल्याचा दावा करण्यात आला आहे. तो ज्या रुग्णालयात आहे त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आला असून, त्याच्यासाठी संपूर्ण मजला राखीव आहे. फक्त रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाच तिथे जाण्याची परवानगी आहे.
advertisement
दाऊद इब्राहिमची प्रकृती विषबाधेमुळे बिघडली की त्यामागे आणखी काही कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण, ट्विटरपासून ते मीडिया रिपोर्ट्सपर्यंत सर्वत्र विषबाधेचीच चर्चा रंगली आहे. कोणीतरी दाऊदला विष दिल्याचा दावा केला जात आहे. भारतातून फरार झालेला दाऊद अनेक दिवसांपासून कराचीमध्ये राहत आहे.
advertisement
भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी एक असलेल्या दाऊद हा संघटित गुन्हेगारी, दहशतवाद आणि अंमली पदार्थांची तस्करी यासह विविध गुन्हेगारी कारवायांशी संबंध आहे. एवढेच नाही तर 1993मधील मुंबई बॉम्बस्फोटाचा तो मास्टरमाईंड आहे. त्या हल्ल्यात 250 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला होता आणि हजारो लोक जखमी झाले होते.
सध्या मुंबई पोलिसांसह भारतातील इतर तपास यंत्रणा दाऊदशी संबंधित या नवीन अपडेटबाबत अधिक माहिती गोळा करण्यात व्यस्त आहेत. या पूर्वी, जानेवारी महिन्यामध्ये दाऊदची बहीण हसीना पारकरच्या मुलाने एनआयएला सांगितलं होतं की, दुसऱ्या लग्नानंतर दाऊद कराचीमध्ये राहत होता. एनआयएने दाऊदविरुद्धच्या आरोपपत्रात असं म्हटलं आहे की, दाऊद आणि त्याचे प्रमुख साथीदार पाकिस्तानातील कराची विमानतळ नियंत्रित करतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 18, 2023 11:08 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला काय झालं? हॉस्पिटलमध्ये कधीपासून?









