पाकिस्तानमध्ये चाललंय काय? दाऊदवर विषप्रयोगाची चर्चा, विमानतळांवर लाइट गायब अन् इंटरनेट ठप्प
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
इंटरनेट ठप्प होण्यामागचं कारण पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय या पक्षाची व्हर्च्युअल सभा असल्याचं सांगण्यात येतंय.
इस्लामाबाद, 18 डिसेंबर : पाकिस्तानमध्ये रविवारी अचानक विमानतळांवरची लाइट गेल्याचं आणि इंटरनेट ठप्प झाल्याचं समोर आलं आहे. पीटीआयच्या व्हर्च्युअल सभेआधी इंटरनेट बंद केलं गेल्याचा दावा आता पीटीआयच्या नेत्यांनी केलाय. दरम्यान, लष्कर ए तय्यबाचा दहशतवादी हबीबुल्ला उर्फ भोला खान उर्फ खान बाबा याचा अज्ञाताने केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. पाकिस्तानमध्ये त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. भोला खान हा भारतविरोधी कारवाया करणाऱ्या दावर खान कुंडीचा चुलत भाऊ होता. दावर खान कुंडीला चुलत भावाच्या हत्येमुळे धक्का बसला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, हल्लेखोरांनी रुनवालमध्ये भोला खानवर गोळीबार केला. त्याचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह रुग्णालयात नेला. दरम्यान, पाकिस्तानमध्ये विमानतळांवर लाइट गेल्याचं आणि देशात इंटरनेट बंद करण्यात आल्याचंही समोर आलं आहे.
advertisement
पाकिस्तानमधील इंटरनेटसेवा ठप्प झाल्याने युजर्सना त्रास सहन करावा लागला. इंटरनेट ठप्प होण्यामागचं कारण पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय या पक्षाची व्हर्च्युअल सभा असल्याचं सांगण्यात येतंय.
⚠️ Confirmed: Live metrics show a nation-scale disruption to social media platforms across #Pakistan, including X/Twitter, Facebook, Instagram and YouTube; the incident comes just ahead of a major virtual gathering organized by persecuted opposition leader Imran Khan's party, PTI pic.twitter.com/ifWNN9ZwYL
— NetBlocks (@netblocks) December 17, 2023
advertisement
इम्रान खान हे सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्या पक्षाने शक्तीप्रदर्शनासाठी व्हर्च्युअल सभेचं आयोजन केलं होतं. पण त्याआधी एक्स, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूबसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ठप्प झाले. रविवारी रात्री ९ वाजता सभा सुरू झाली. तर लाहोर, कराची आणि इस्लामाबादमध्ये रात्री ८ वाजल्यापासून युजर्सना सोशल मीडिया वापरण्यात अडचणी यायला लागल्या.
advertisement
भोला खानची हत्या, पीटीआयची सभा, इंटरनेट ठप्प या सगळ्या गोंधळात आणखी एक बातमी चर्चेत आहे. भारतासाठी मोस्ट वाँटेड असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. दाऊदला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचं म्हटलं जात असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय. पण याबाबत पाकिस्तानी माध्यमे किंवा इतर कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 18, 2023 6:47 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
पाकिस्तानमध्ये चाललंय काय? दाऊदवर विषप्रयोगाची चर्चा, विमानतळांवर लाइट गायब अन् इंटरनेट ठप्प









