advertisement

Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला दिलं विष? परिस्थिती गंभीर, सोशल मीडियावर व्हायरल

Last Updated:

Dawood Ibrahim : पाकिस्तानातील कराची येथे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम रुग्णालयात भरती केल्याचं बोललं जात आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला विषबाधा?
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला विषबाधा?
कराची, 18 डिसेंबर : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दाऊद इब्राहिमला पाकिस्तानातील कराची येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. त्याला विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे. अनेक गुप्तचर संघटनांच्या रडावर असलेला 65 वर्षीय दाऊद इब्राहिम सध्या कराचीत लपून बसला आहे. अशी माहिती फ्री प्रेस जर्नल या वृत्तसंस्थेने दिली आहे.
भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी एक असलेल्या दाऊद इब्राहिमचा संघटित गुन्हेगारी, दहशतवाद आणि अंमली पदार्थांची तस्करी यासह विविध गुन्हेगारी कारवायांशी संबंध आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटामागे तो मास्टरमाईंड आहे, ज्यात 250 हून अधिक लोक मारले गेले आणि हजारो जखमी झालेत.
दाऊदला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती गुप्त ठेवली गेली आहे. कारण पाकिस्तानी आणि भारतीय दोन्ही अधिकाऱ्यांनी या बातमीला अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही. त्याच्या अचानक प्रकृती बिघडण्यामागे विषबाधा हे कारण असू शकते, असे अंदाज बांधले जात असून, त्यामुळे या प्रकरणाचं गूढ वाढलं आहे.
advertisement
दाऊद इब्राहिम काठीवर?
द फ्री प्रेस जर्नलच्या आधीच्या रिपोर्टनुसार, एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्डचा डॉन असलेल्या दाऊद इब्राहिमला आता आरोग्याच्या अनेक गंभीर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. गँगरीमुळे त्याच्या दोन पायाची बोटे कराचीच्या रुग्णालयात कापण्यात आली होती. मात्र, या गोष्टीला त्याचा जवळचा सहकारी, छोटा शकीलने नकार दिला होता.
advertisement
पाकिस्तानी मीडियाचं मौन
मात्र, याला अद्याप कोणत्याही पाकिस्तानी मीडियाने दुजोरा दिलेला नाही. पाकिस्तानचे राष्ट्रीय दैनिक डॉन आणि जिओ टीव्हीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उघड केलेली नाही. सोशल मीडिया पोस्टमध्ये दाऊदला कडक सुरक्षेत कराचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या वर्षी मे महिन्यापासून पाकिस्तानच्या विविध शहरांमध्ये अनेक वॉन्टेड दहशतवादी मारले गेले आहेत. शेजारच्या देशात मारले गेलेले सर्व दहशतवादी भारतीय सुरक्षा दल किंवा सुरक्षा आस्थापनांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांसाठी दोषी होते. ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या यादीत मौलाना झियाउर रहमान, मुफ्ती कैसर फारुख आणि शाहिद लतीफ यांचा समावेश आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला दिलं विष? परिस्थिती गंभीर, सोशल मीडियावर व्हायरल
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement