इराणच्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू, 40 दिवसांचा दुखवटा; दिवसभरात काय काय घडले?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
इराणच्या इस्लामिक क्रांतिचा प्रमुख चेहरा असलेले अयातुल्ला सैय्यद अली खामेनी यांचा अमेरिका -इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात मृत्य झाला.
Iran and Israel: अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सुप्रीम नेते अय़ातुल्लाह अली खामेनी ठार झाले. इराणी मीडिया आणि प्रेस टीव्हीने निधनाचा दावा केलाय.खामेनी यांच्या निधनामुळे इराणमध्ये राजकीय आणि सामाजिक अशांतता निर्माण झाली आहे. यामुळे ४० दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय.. या घटनेने संपूर्ण आखाती प्रदेशातील सुरक्षा आणि भू-राजकीय संतुलनाला आव्हान दिलंय.
इरानच्या इस्लामिक क्रांतिचा प्रमुख चेहरा असलेले अयातुल्ला सैय्यद अली खामेनी यांचा अमेरिका -इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात मृत्य झाला. इराणच्या सरकारी मीडियाने खोमेनीच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.शनिवारी खामेनी यांच्या सरकारी निवासस्थानी हल्ला झाला. त्यावेळी खोमेनी नियमित कामकाजात व्यस्त होते.
इराणच्या सरकारी मीडियावर खोमेनीच्या मृत्यूचं वृत्त
इराणचा सरकारी चॅनेल Press TV आणि राष्ट्रीय वृत्त संस्था Islamic Republic News Agency ने अयातुल्ला खोमेनी यांच्या मृत्यूचे वृत्त दिले आहे. अमेरिका - इस्रायल संयुक्त हवाई हल्ल्यात खामेनी आणि त्यांच्या कुटुंबातील काही लोक ठार झाल्याचे इराणच्या सरकारी चॅनेलने म्हटले आहे.इरानी स्टेट टीव्हीने हा भ्याड हल्ला असल्याचे म्हटले आहे. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराण मध्ये सरकारने चाळीस दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच सात दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे.राजधानी तेहरानमध्ये सुरक्षा दलांनी हाई अलर्ट जारी केला आहे.रस्त्यांवर तणावाचे वातावरण आहे
advertisement
ट्रम्प यांनी खामेनीना ठरवलं जगातील सर्वात क्रूर व्यक्ती
इराणच्या प्रसार मध्यमांनी खोमेनींच्या मृत्यूची पुष्टी करण्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर खामेनी यांच्या मृत्यूविषयी पोस्ट केली होती. खोमेनी हा इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्ती होता. आता त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे केवळ इराणी नागरिकांना न्याय मिळाला आहे असे नाही तर अमेरिका आणि जगभरातील अनेक देशातील लोकांना न्याय मिळाला आहे.ज्यांना खोमेनी आणि त्यांच्या गुंडांनी ठार मारले होते . खोमेनी आमच्या गुप्तचर यंत्रणेने पासून लपून राहू शकला नाही. तसेच इराणी नागरिकांसाठी ही एक संधी असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
advertisement
सूड घेण्याची इराणची धमकी
इराणच्या परराष्ट्र मंत्र्याने या हल्ल्याचा सूड घेणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पश्चिम आशियावर युद्धाचे ढग निर्माण झाले आहेत. खोमेनी यांच्या मृत्यूनंतर जागतिक भौगोलिक राजकारण बदलण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.तसेच अण्वस्त्र युद्धाचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.
इरणाची सूत्र कुणाच्या हाती?
खोमेनी यांच्या मृत्यू नंतर इराणच्या सत्तेचा उत्तराधिकारी कोण या वरून राजकीय संकट निर्माण झाले आहे. इस्लामिक गणराज्याचे संविधान आणि विलायत-ए-फकीह या विचारधारे अंतर्गत इराणच्या सर्वोच नेत्याच्या निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. इराणच्या सुप्रीम लीडरची निवड ही इराणच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची महत्त्वाची मानली जात आहे .
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 01, 2026 9:34 PM IST







