Iran News: खामेनेई इज डेड! इस्त्रायल अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचा सर्वोच्च नेता ठार
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Iran War News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर दावा केला आहे की इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई अमेरिका-इस्रायली हल्ल्यात मारले गेले आहेत.
Iran War News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर दावा केला आहे की इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई अमेरिका-इस्रायली हल्ल्यात मारले गेले आहेत. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रम्प यांनी खामेनेई यांचा उल्लेख इतिहासातील सर्वात धोकादायक नेत्यांपैकी एक असा केला आहे. खामेनेई यांचा मृत्यू हा इराणी लोकांसाठी आणि जगासाठी "न्याय" आहे.
ट्रम्प यांनी दावा केला की, खामेनेई हे प्रगत गुप्तचर आणि ट्रॅकिंग सिस्टमपासून वाचू शकले नाहीत आणि ही कारवाई इस्रायलच्या सहकार्याने करण्यात आली. त्यांनी सांगितले की इराणी लोकांसाठी त्यांचा देश परत मिळवण्याची ही सर्वात मोठी संधी आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी असंही म्हटले की इराणच्या लष्करी आणि सुरक्षा दलातील अनेक सदस्य आता लढू इच्छित नाहीत. आता ते सीजफायरची मागणी करत आहेत.
advertisement
ट्रम्प यांच्या मते, जर त्यांनी आता आत्मसमर्पण केले तर त्यांना दिलासा मिळू शकतो, अन्यथा नंतर कठोर कारवाई केली जाईल. त्यांनी असेही संकेत दिले की, आवश्यक वाटल्यास उर्वरित आठवड्यात बॉम्बस्फोट चालू राहू शकतो. ट्रम्प यांनी सांगितले की या कारवाईचे उद्दिष्ट मध्य पूर्व आणि जगात शांतता प्रस्थापित करणे आहे.
ट्रम्प यांच्या दाव्यानंतर आता इराणशी संबंधित असलेल्या फार्स वृतसंस्थेनं देखील याची पुष्टी केली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मृतांमध्ये खामेनेई यांची मुलगी, जावई, नातू आणि सून यांचा समावेश आहे.
Location :
Delhi
First Published :
Mar 01, 2026 6:31 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
Iran News: खामेनेई इज डेड! इस्त्रायल अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचा सर्वोच्च नेता ठार







