पृथ्वी वाचली पण चंद्र धोक्यात, वैज्ञानिकांचा थरकापजनक इशारा; अवकाशातील महाभयंकर विस्फोटाची वेळ, तारीख समोर

Last Updated:

City Killer Asteroid: एक प्रचंड एस्टेरॉईड 2032 मध्ये चंद्रावर आदळण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. 'सिटी किलर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अंतराळचट्टानामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर महाकाय स्फोट आणि मोठा खड्डा निर्माण होऊ शकतो.

News18
News18
नवी दिल्ली: आकाशातून मोठा धमाका दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र घाबरू नका हा धमाका पृथ्वीवर नव्हे तर चंद्रावर होऊ शकतो. शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की ‘2024 YR4’ नावाचा एक मोठा लघुग्रह (ऍस्टेरॉईड) 2032 मध्ये चंद्रावर आपटण्याची शक्यता वाढली आहे. या अवकाशीय खडकाचा आकार 53 ते 67 मीटर दरम्यान असल्याचं सांगितलं जात असून, हा 1908 मध्ये रशियातील तुंगुस्का स्फोटासाठी जबाबदार असलेल्या क्षुद्रग्रहाएवढाच मोठा आहे. जर हा पृथ्वीवर आदळला असता तर एक संपूर्ण शहर नष्ट झालं असतं. मात्र दिलासादायक बाब म्हणजे पृथ्वीला सध्या कुठलाही धोका नाही, पण चंद्र मात्र याच्या रडारवर आहे.
फेब्रुवारी 2025 पर्यंत शास्त्रज्ञांचा अंदाज होता की या क्षुद्रग्रहाच्या चंद्रावर आदळण्याची शक्यता 3.8 टक्के आहे. पण मे 2025 मध्ये जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (JWST) कडून मिळालेल्या नव्या डेटानुसार ही शक्यता आता 4.3 टक्क्यांवर गेली आहे. जॉन्स हॉपकिन्स अप्लाइड फिजिक्स लॅबोरेटरीचे शास्त्रज्ञ अँडी रिवकिन यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास चालू आहे. त्यांच्यानुसार या टक्करमुळे चंद्राला फारसा धोका पोहोचणार नाही. त्याची कक्षा बदलणार नाही, तो फुटणारही नाही. मात्र चंद्राच्या पृष्ठभागावर एक मोठा खड्डा जरूर बनेल, जो शास्त्रज्ञांसाठी अत्यंत रोमांचक ठरेल.
advertisement
या प्रभावामुळे आपल्याला अवकाशातील वस्तूंची गती, ऊर्जा आणि टक्कर झाल्यानंतर काय घडतं याबद्दल मौल्यवान माहिती मिळू शकते. सध्या हा अंतिम अंदाज नाही, कारण ‘2024 YR4’ सध्या खूप दूर आहे आणि त्याला पाहणं कठीण आहे. पण 2028 मध्ये जेव्हा हा पुन्हा पृथ्वीजवळ येईल, तेव्हा खगोलशास्त्रज्ञ त्याची कक्षा आणि टक्कर होण्याची शक्यता अधिक अचूकपणे तपासू शकतील.
advertisement
जर ही टक्कर झाली, तर हे दृश्य शास्त्रज्ञांसाठीच नव्हे तर सामान्य लोकांसाठीही आकाशातील एक अद्वितीय शो ठरू शकतो. यात फक्त स्फोटच नाही, तर ज्ञानाही मिळाले.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
पृथ्वी वाचली पण चंद्र धोक्यात, वैज्ञानिकांचा थरकापजनक इशारा; अवकाशातील महाभयंकर विस्फोटाची वेळ, तारीख समोर
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement