Donald Trump Protest : अमेरिकेत ट्रम्प यांच्याविरोधात आंदोलनाचा भडका, लाखो नागरीक रस्त्यावर, कारण काय?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Protest Against Trump : अवघ्या 3 महिन्यातच अमेरिकन जनतेत नाराजीचा भडका उडाला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सल्लागार, उद्योजक एलन मस्क यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणावर निर्दशने सुरू आहेत.
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेत येऊन तीन महिनेही झाले नाहीत. परंतु त्यांनी आपल्या निर्णयांनी अमेरिकन जनतेला नाराज केले असल्याचे चित्र आहे. अवघ्या 3 महिन्यातच अमेरिकन जनतेत नाराजीचा भडका उडाला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सल्लागार, उद्योजक एलन मस्क यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणावर निर्दशने सुरू आहेत. अमेरिकेतील 50 राज्यातील 1200 शहरांमध्ये निर्दशने करण्यात आली. या आंदोलनात लाखो लोकांनी सहभाग घेतला आहे.
अमेरिकेतील सर्व ५० राज्यांमध्ये या निषेधात लाखो लोक सहभागी झाले होते. हे लोकशाही समर्थक चळवळ 'हँड्स ऑफ'ने आयोजित केले होते. ट्रम्प आणि मस्क यांच्या निर्णयामुळे शत्रुत्वपूर्ण व्यवसाय आणि अमेरिकन हक्क आणि स्वातंत्र्यांवर हल्ले सुरू झाले असल्याचा आरोप केला आहे. 'सीएनएन'ने दिलेल्या वृत्तानुसार, हँड्स ऑफ चळवळीमुळे देशभरातील राज्यांमध्ये 1400 हून अधिक निदर्शने झाली. हे निदर्शने राज्यांच्या राजधानी, शासकीय कार्यालये, सिनेट-काँग्रेस प्रशासकीय कार्यालये, सामाजिक सुरक्षा मुख्यालये, उद्याने आणि शहर सभागृहांमध्ये आयोजित करण्यात आली.
advertisement
अब्जाधीशांनी सत्ता बळकावली असल्याचा आरोप करत ही निदर्शने केली जात आहेत. आंदोलकांनी तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. ट्रम्प प्रशासन हे अब्जाधीशांच्या कचाट्यातून सोडवा आणि भ्रष्टाचार संपवा, लोककल्याणकारी, सामाजिक सुरक्षा योजनेचा निधी कायम ठेवावा, त्यात कपात करू नये आणि स्थलांतरीत, ट्रान्सजेंडर समुदाय आणि इतर समुदायांवर हल्ले रोखा आदी तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
advertisement
ट्रम्प हे हुकूमशहा असल्याचा आरोप...
या निदर्शनात सहभागी होण्यासाठी सुमारे ६ लाख लोकांनी नोंदणी केली होती. लंडन आणि पॅरिससारख्या शहरांमध्येही काही निदर्शने झाली. डेमोक्रॅटिक खासदार जेमी रस्किन आणि भारताविरुद्ध विष ओकणाऱ्या इल्हान ओमर यांनीही यात भाग घेतला. त्यांनी ट्रम्प यांच्या धोरणांवर जोरदार टीका केली. जेमी रस्किन म्हणाले, 'आपले संविधान 'आम्ही हुकूमशहा' ने सुरू होत नाही तर 'आम्ही लोक' ने सुरू होते. कोणत्याही नैतिक व्यक्तीला अर्थव्यवस्थेच्या संकटात सापडलेला हुकूमशहा नको असतो असे त्यांनी म्हटले.
advertisement
ट्रम्पच्या धोरणांवर नागरीक नाराज
ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांनी प्रशासकीय खर्च आणि विविध योजनांच्या निधीत मोठी कपात केली आहे. ट्रम्प प्रशासनाने कपातीचे धोरण आखण्यात आले आहे. यावर अमेरिकेत असंतोष दिसून येत आहे. प्रशासकीय खर्चांच्या कपातीमुळे हजारो कर्मचाऱ्यांना शासकीय नोकरीतून कमी करण्यात आले आहे. त्याशिवाय टॅरिफ दरात वाढ केल्याचा परिणाम अमेरिकेवर होणार आहे. अमेरिकेतील एक टक्का अब्जाधीशांना सोडून सगळ्या समाजघटकांना ट्रम्प प्रशासन लक्ष्य करण्यात येत असल्याचे आंदोलकांनी म्हटले.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
April 06, 2025 2:23 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Donald Trump Protest : अमेरिकेत ट्रम्प यांच्याविरोधात आंदोलनाचा भडका, लाखो नागरीक रस्त्यावर, कारण काय?