advertisement

दोस्तच ठरला जीवाचा दुश्मन, अंडरग्राऊंड असलेल्या खामेनेईना इस्त्रायलनं कसं मारलं? मोसादची खतरनाक फिल्डिंग

Last Updated:

How Irani Supereme Leader Ayatollah Ali Khamenei Killed: शनिवारी सकाळी इस्त्रायलने इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर नव्या युद्धाला तोंड फुटलं आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. आता यामागे मोसाद कनेक्शन समोर आलं आहे.

News18
News18
How Irani Supereme Leader Ayatollah Ali Khamenei Killed: शनिवारी सकाळी इस्त्रायलने इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर नव्या युद्धाला तोंड फुटलं आहे. हा हल्ला होताच अमेरिकेनं देखील युद्धात उडी घेतली असून त्यांनी इस्त्रायलच्या बाजुने इराणविरोधात युद्ध पुकारलं आहे. या युद्धात कालपासून शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचा देखील समावेश आहे. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त लष्करी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.
अमेरिका-इस्त्रायलने खामेनेईंना कसं मारलं?
अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी (२८ फेब्रुवारी) सकाळी इराणवर मोठा हल्ला केला. दोन्ही देशांच्या हवाई दलाने तेहरानमधील खामेनेई यांच्या निवासस्थानासह अनेक ठिकाणांना टार्गेट केलं. ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी खामेनेई हे त्यांच्या वरिष्ठ सल्लागारांसोबत हेड क्वार्टरमध्ये उच्चस्तरीय बैठक घेत होते. त्याच वेळी हा स्ट्राइक करण्यात आला.
वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, इस्त्रायली लढाऊ विमानांनी खामेनेई यांच्या घरावर एकाच वेळी तब्बल ३० बॉम्ब टाकले. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई, वरिष्ठ अधिकारी आणि खामेनेई यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये खामेनेई यांची मुलगी, जावई, नातू आणि सून यांचा समावेश आहे.
advertisement
इस्त्रायलनं खामेनेईंना कसं शोधलं?
विविध मीडिया रिपोर्टनुसार, इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई मागील काही दिवसांपासून अंडरग्राऊंड होते. त्यांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावली नव्हती. त्यामुळे ते नेमके कुठे आहेत? याचा काहीच तपास इस्त्रायली सैनिकांना आणि तपास यंत्रणांना नव्हता. पण इस्त्रायलची गुप्तहेर संघटना मोसादने खामेनेईंच्या ठिकाणांचा पत्ता शोधून काढला. यासाठी त्यांनी खामेनेई यांचे सिक्युरिटी अॅडव्हायजर शमखानी यांचा वापर केल्याची माहिती आहे.
advertisement
मागील काही दिवसांपासून इस्त्रायलकडून शमखानी यांना ट्रेस केलं जात होतं. इस्त्रायलने शनिवारी रात्री इराणवर हल्ला करण्याचा प्लॅन आखला होता. मात्र शनिवारी सकाळी खामेनेई हे एक उच्च स्तरीय बैठक घेणार असल्याची माहिती मोसादला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे आणि शामखानीच्या ट्रेसिंगच्या आधारे इस्त्रायलने खामेनेईंना संपवलं आहे.
खरं तर, हा हल्ला रात्री केला जाणार होता. मात्र शामखानीला ट्रेस करत असताना ते उच्चस्तरीय बैठकीसाठी खामेनेई यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती इस्त्रायलला मिळाली. त्या बैठकीत खामेनेई आणि IRGS प्रमुख मेजर जनरल मोहम्मद पाकपोर हेही असल्याचं इस्त्रायलला कळालं. यानंतर लक्ष ठेवून असलेल्या इस्त्रायलने रात्री ऐवजी शनिवारी सकाळीच हल्ला केला. सैन्य दलाने एकाचवेळी तब्बल ३० बॉम्ब याठिकाणी टाकले यात खामेनेई यांच्या बैठकीत उपस्थित असलेली शामखानी, पाकपोर आणि कुटुंबातील इतर सदस्यांचा मृत्यू झाला.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
दोस्तच ठरला जीवाचा दुश्मन, अंडरग्राऊंड असलेल्या खामेनेईना इस्त्रायलनं कसं मारलं? मोसादची खतरनाक फिल्डिंग
Next Article
advertisement
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'; ट्रम्प यांनी केली जगातील सर्वात मोठी लष्करी घोडचूक
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'
  • इराण म्हणजे व्हेनेझुएला नाही!

  • अमेरिकेने छेडला मधमाश्यांचा मोहोळ

  • डोनाल्ड ट्रम्प यांचा आत्मघातकी डाव

View All
advertisement