PAK चे पाच फायटर जेट पाडले, IAF चीफच्या वक्तव्याने पाकड्यांना झोंबल्या मिर्च्या, मंत्री काय म्हणाले? पाहा

Last Updated:

Pakistan Denies IAF Chief Claims : भारतीय हवाई दल प्रमुखांनी पुराव्यांसह सत्य सर्वांसमोर ठेवले होते, त्यामुळे पाकिस्तानला समोर येऊन बोलणं भाग पडलं.

Pakistani aircraft hit in Operation Sindoor
Pakistani aircraft hit in Operation Sindoor
Pakistani aircraft hit in Operation Sindoor : भारताचे हवाई दल प्रमुख मार्शल एपी सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरवर अनेक खळबळजनक खुलासे केले होते. मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय संरक्षण यंत्रणेने पाच पाकिस्तानी लढाऊ विमाने आणि एक पाळत ठेवणारे विमान पाडले होते, अशी माहिती देत एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह यांनी पाकिस्ताची जगासमोर पोलखोल केली होती. अशातच आता पाकिस्तानला मिर्च्या झोंबल्याचं पहायला मिळतंय.

पाकिस्तानची पोलखोल

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताच्या दाव्यांना पूर्णपणे फेटाळून लावले आहे. भारतीय हवाई दलाने (IAF) ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान एकही पाकिस्तानी लष्करी विमान पाडलेले नाही किंवा नष्ट केलेले नाही, असा दावा केलाय. भारतीय हवाई दल प्रमुखांनी पुराव्यांसह सत्य सर्वांसमोर ठेवले होते, त्यामुळे पाकिस्तानला समोर येऊन बोलणं भाग पडलं. मात्र, यावेळी पाकिस्तानची पोलखोल झाल्याचं पहायला मिळालं.
advertisement

अनाकलनीय दावे 

भारताने एकही पाकिस्तानी विमान पाडले नाही किंवा नष्ट केले नाही. गेल्या तीन महिन्यांपासून असे कोणतेही दावे करण्यात आले नव्हते. उलट, पाकिस्तानने त्यावेळी आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर तांत्रिक माहिती दिली होती, असं ख्वाजा आसिफ बचावात म्हणाले. भारतीय हवाई दलाच्या प्रमुखांनी आता केलेले दावे अनाकलनीय आणि चुकीच्या वेळी केले असल्याचेही आसिफ यांनी म्हटले आहे.
advertisement

पाकिस्तानची भंबेरी उडाली

दरम्यान, नियंत्रण रेषेवर (LOC) भारताचे जास्त नुकसान झाले आहे. जर सत्याची पडताळणी करायची असेल तर दोन्ही देशांनी आपल्या विमानांची माहिती स्वतंत्र तपासणीसाठी खुली करावी, अशी मागणी देखील त्यांनी सोशल मीडियावर केली आहे. मात्र, पाकिस्तानची यावेळी भंबेरी उडाली यात काहीही शंका नाही.

दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला

advertisement
भारतीय हवाई दलाचे प्रमुख एपी सिंह म्हणाले की, ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानमधील आणि सीमेजवळील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यावेळी आमच्याकडे पुरावे आहेत, त्यामुळे यावेळी बालाकोट हवाई हल्ल्यासारखा वाद होणार नाही, असे ते म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
PAK चे पाच फायटर जेट पाडले, IAF चीफच्या वक्तव्याने पाकड्यांना झोंबल्या मिर्च्या, मंत्री काय म्हणाले? पाहा
Next Article
advertisement
BJP vs Shiv Sena Ambernath : भाजपचा डाव फसला, शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक, अंबरनाथ नगर परिषदेत मोठी उलथापालथ, सगळा गेमच फिरला!
भाजपचा डाव फसला, शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक, गेमच फिरला अंबरनाथमध्ये उलथापाल
  • अंबरनाथ नगरपरिषदेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.

  • शिवसेना शिंदे गटाची अंबरनाथमधून सत्ता उलथवण्यासाठी भाजपने जंग पछाडलं.

  • शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे भाजप पुरता घायाळ

View All
advertisement