Israel Attacks Iran : इस्रायलने पहिल्याच अटॅकमध्ये इराणचं कंबरडं मोडलं, आर्मी चीफ आणि 3 शास्त्रज्ञ ठार

Last Updated:

Israel Attack on Iran : इस्रायलने इराणवर मोठा हल्ला केला. इराणी माध्यमांनुसार, इस्रायली हल्ल्यात अनेक उच्च लष्करी अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञ ठार झाले. 

News18
News18
इराण : शुक्रवारी पहाटे इस्रायलने इराणवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. इराणच्या लष्करी स्थळांवर आणि अणुस्थळांना लक्ष्य करण्यात आले. इस्रायली हल्ल्यात इराणचं मोठं नुकसान झालं आहे. इस्रायली हल्ल्यात आयआरजीसी म्हणजेच इराण रिव्होल्युशनरी गार्ड्सचे कमांडर चीफ हुसेन सलामी यांचा मृत्यू झाला आहे. अनेक शीर्ष अणुशास्त्रज्ञदेखील मारले गेले आहेत.
इस्रायलने इराणवरील हल्ल्याला 'ऑपरेशन रायझिंग लायन' असं नाव दिलं आहे. इस्रायली सैन्याने तेहरान आणि नतान्झसारख्या शहरांमधील लष्करी आणि अणु तळांना लक्ष्य केलं. इराणी माध्यमांनी पुष्टी केली की राजधानी तेहरानच्या ईशान्येकडील मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि आकाशात काळ्या धुराचे लोट पसरले.
advertisement
इराणी माध्यमांनुसार, इस्रायली हल्ल्यात अनेक उच्च लष्करी अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञ ठार झाले. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) प्रमुख जनरल हुसेन सलामी, खातम अल-अंबिया प्रमुख सरदार रशीद आणि दोन प्रमुख अणुशास्त्रज्ञ डॉ. फेरेदून अब्बासी आणि डॉ. तेहरानची यांचा मृत्यू झाला. यामुळे इराणच्या लष्करी आणि वैज्ञानिक नेतृत्वाला मोठा धक्का बसला आहे.
इस्रायलने कुठे हल्ला केला?
आयडीएफ म्हणजेच इस्रायली संरक्षण दलाचा दावा आहे की त्यांनी इराणचा अणुकार्यक्रम आणि लष्करी तळ नष्ट करण्यासाठी हा हल्ला केला. इराणी माध्यमांनुसार, इस्रायलने या युरेनियम सुविधेवर अनेक वेळा हल्ला केला आहे. अहवालात म्हटलं आहे की इस्रायलने नतान्झ अणुस्थळावरही अनेक वेळा हल्ला केला आहे.
advertisement
इस्रायलचे बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, इस्रायलच्या इतिहासातील हा एक निर्णायक क्षण आहे. आम्ही इराणला अण्वस्त्रं बनवू देणार नाही.
इराणनं म्हटलं भ्याड हल्ला
इराणने या हल्ल्याला भ्याड हल्ला म्हटलं आहे. तसंच इराणला प्रत्युत्तर देण्याची धमकीही दिली आहे. इराणचं म्हणणं आहे की इस्रायलला याची मोठी किंमत मोजावी लागेल. तथापि, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Israel Attacks Iran : इस्रायलने पहिल्याच अटॅकमध्ये इराणचं कंबरडं मोडलं, आर्मी चीफ आणि 3 शास्त्रज्ञ ठार
Next Article
advertisement
ZP Election: ज्याची भीती होती तेच झालं, जिल्हा परिषद निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, सुप्रीम कोर्ट काय करणार?
ज्याची भीती होती तेच झालं, ZP निवडणुकीबाबत SEC चा मोठा निर्णय, सुप्रीम कोर्टात
  • राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पेच अधिकच गडद झाला आहे

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश र

  • राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

View All
advertisement