नेपाळमधून आली मोठी बातमी; अंतरिम प्रमुख सुशीला कार्की यांचे भारत, मोदींवर धडाकेबाज वक्तव्य; भारतीय नेहमी नेपाळचं...
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Sushila Karki On India: काठमांडूतील राजकीय उलथापालथीनंतर अंतरिम प्रमुख झालेल्या सुशीला कार्की यांनी भारताशी असलेले आपले अतूट नाते व्यक्त केले. मोदींच्या कार्यशैलीचे कौतुक करत त्यांनी “भारतीय मला बहिणीसारखं मानतात” असे भावनिक वक्तव्य केले.
काठमांडू: भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या आरोपांवरून झालेल्या जनआंदोलनामुळे सरकार कोसळल्यानंतर नेपाळच्या अंतरिम प्रमुखपदी माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेपाळच्या इतिहासात सरन्यायाधीश पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. आता नव्या निवडणुका होईपर्यंत त्या देशाला या संक्रमण काळात मार्गदर्शन करतील. बुधवारी सकाळी 'जनरल-झी' (Gen-Z) आंदोलनाच्या व्हर्च्युअल बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या युवा-नेतृत्वाखालील गटाने, ज्याने आंदोलनाचे नेतृत्व केले त्यांनी सुशीला कार्की यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना सध्याच्या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी पाठिंबा दिला.
advertisement
पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी भ्रष्टाचार, घराणेशाही आणि सोशल मीडियावर बंदी या विरोधात झालेल्या तीव्र निदर्शनांनंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नेपाळमधील राजकीय अस्थिरता संपुष्टात आणण्यासाठी सुशीला कार्की यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
advertisement
नेपाळमध्ये मोठा ट्विस्ट,आतापर्यंतची महत्वाची बातमी, नवा आशेचा किरण,आंदोलकांचा...
मी जबाबदारी स्वीकारण्यास तयार
एका वृत्तसंस्थेशी बोलताना कार्की यांनी हे पद स्वीकारण्याची तयारी दर्शवली. मी देशाच्या हितासाठी काम करण्यास तयार आहे. नेपाळमधील सध्याच्या आंदोलनाचे नेतृत्व जनरल-झी गटाने केले आणि त्यांनी थोड्या काळासाठी सरकारचे नेतृत्व करण्यासाठी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. या विश्वासाने आपण भारावून गेल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
पीडितांच्या कुटुंबीयांना मदत प्राधान्य
कार्की यांनी सांगितले की, त्यांचे तात्काळ प्राधान्य आंदोलनात ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबीयांना सन्मान देणे आणि मदत करणे हे असेल. आमचे तात्काळ लक्ष आंदोलनात ज्या तरुणांनी जीव गमावला त्यांच्यासाठी काहीतरी करण्यावर असेल.
advertisement
मतदानाने झाली निवड
कार्की यांनी पुष्टी केली की- आंदोलनातील तरुण सदस्यांनी, मुली आणि मुलांनी" त्यांच्या नावाला पसंती दिली. "मी अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्याची त्यांची विनंती स्वीकारली आहे, असे त्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
नेपाळच्या राजकीय इतिहासावर भाष्य
नेपाळच्या राजकीय इतिहासावर बोलताना कार्की यांनी सध्याची परिस्थिती कठीण असल्याचे मान्य केले. नेपाळमध्ये पूर्वीपासूनच समस्या आहेत. सध्याची परिस्थिती खूप कठीण आहे, असे त्या म्हणाल्या. आव्हाने असूनही त्या आशावादी आणि वचनबद्ध राहिल्या. आम्ही नेपाळच्या विकासासाठी एकत्र काम करू, असे सांगत. आम्ही देशासाठी एक नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.
advertisement
नेपाळमध्ये ऐतिहासिक कलाटणी! Gen-Zचा धाडसी निर्णय, नेतृत्वासाठी कार्की यांची निवड
भारतासोबतचे घनिष्ट संबंध
भारतासोबतच्या नेपाळच्या संबंधांबद्दल बोलताना कार्की म्हणाल्या की, हे संबंध अनेक वर्षांपासून मजबूत आहेत. भारतासाठी खूप आदर आणि प्रेम आहे. भारताने नेपाळला खूप मदत केली आहे.
भारतीय मला बहिणीसारखं मानतात
advertisement
स्वतःला भारताची मैत्रीण मानणाऱ्या सुशीला कार्की यांनी बनारस हिंदू विद्यापीठातील (BHU) त्यांच्या वर्षांची आठवण सांगितली. 1975 मध्ये त्यांनी याच विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली होती. मी भारतीय नेत्यांनी खूप प्रभावित आहे. भारतीय मित्र मला बहिणीसारखं मानतात.
आपल्या विद्यापीठाच्या दिवसांची आठवण सांगताना त्या म्हणाल्या- मी बीएचयूमध्ये शिकले... माझे भारतात अनेक मित्र आहेत. मला आजही बीएचयूतील माझे शिक्षक आठवतात. भारतासोबतचे आमचे संबंध खूप चांगले आणि जुने आहेत. भारताने नेपाळला खूप मदत केली आहे. भारतीय लोक नेहमी नेपाळचे भले चिंततात.
भारतासोबतच्या संबंधांवर भाष्य
सुशीला कार्की यांनी भारतासोबतच्या संबंधांवर आपले विचार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, भारत आणि नेपाळचे संबंध खूप जुने आहेत. दोन्ही देशांतील जनतेचे नाते खूप घट्ट आहे. आमचे अनेक नातेवाईक आणि मित्र भारतात आहेत. कार्की यांनी भारत आणि नेपाळच्या संबंधांची तुलना घराच्या स्वयंपाकघरातील भांड्यांशी केली. ज्याप्रमाणे स्वयंपाकघरात जास्त भांडी असली की त्यांच्यात कधी-कधी आवाज होतो, त्याचप्रमाणे भारत आणि नेपाळमध्ये कधी-कधी छोटे-मोठे वाद होतात. परंतु आमचे नाते खूप मजबूत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदींचे केले कौतुक
यावेळी त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही नाव घेतले आणि त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. मोदीजींना नमस्कार. माझ्या मनात मोदीजींबद्दल चांगली भावना आहे, असे त्या म्हणाल्या. त्यांनी इतर भारतीय नेत्यांचीही प्रशंसा केली. परंतु त्यांची नावे घेतली नाहीत.
अंतरिम सरकार स्थापनेबाबत अनिश्चितता
अंतरिम सरकारबाबत विचारलेल्या प्रश्नावर कार्की म्हणाल्या की, माझ्या नावाचा केवळ प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. अजून काहीही निश्चित झालेले नाही. सध्या आम्ही चर्चा करत आहोत. उद्या काहीही बदलू शकते.
लष्कराने परिस्थिती हाताळली
नेपाळमधील सध्याच्या परिस्थितीवर बोलताना कार्की यांनी काठमांडूतील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर नसल्याचे सांगितले. मात्र 20 विद्यार्थ्यांच्या मृत्यूवर त्यांनी दुःख व्यक्त केले. जेव्हा मी मुलांना पाहायला गेले, तेव्हा गोळीबार सुरू होता. पण लष्कराने परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. सध्या राजकारणापेक्षा शांतता अधिक महत्त्वाची आहे, असे त्यांनी नमूद केले.
भारत-नेपाळ सीमेवरील अनुभव
आपले घर सीमेजवळ असल्यामुळे त्या नेहमी सीमेवरील बाजारात जात असत, असेही कार्की यांनी सांगितले. त्यांनी भारत-नेपाळमधील जनतेच्या परस्पर संबंधांवर भर दिला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 8:55 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
नेपाळमधून आली मोठी बातमी; अंतरिम प्रमुख सुशीला कार्की यांचे भारत, मोदींवर धडाकेबाज वक्तव्य; भारतीय नेहमी नेपाळचं...