ज्याला विरोध तोच निवडून आला! ट्रम्प यांना झटका, भारतीय वंशाच्या मुस्लीम तरुणानं इतिहास घडवला, न्यूयॉर्कच्या महापौरपदी विजयी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
जोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्क महापौरपदाची निवडणूक जिंकून डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का दिला. ते सर्वात तरुण, भारतीय वंशाचे आणि मुस्लीम महापौर ठरले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा जोरदार झटका बसला आहे. डाव्या विचारांचा भारतीय वंशांचा मुस्लीम सर्वात तरुण असलेला नेता महापौर म्हणून निवडून आला आहे. ज्याला ट्रम्प यांनी सर्वाधिक विरोध केला तोच सगळ्यात जास्त मतांनी निवडून आल्याने ट्रम्प यांनी मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेतील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या न्यूयॉर्कमध्ये राजकीय उलटफेर झाला आहे. भारतीय वंशाचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शानदार विजय मिळवून इतिहास रचला.
ट्रम्प यांना ज्याची भीती तेच घडलं
या निवडणुकीच्या निकालाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला. कारण ट्रम्प यांची इच्छा ममदानी विजयी होऊ नये अशी होती, आता ट्रम्प यांच्या आशांवर पाणी फिरलं. ममदानी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाकावर टिचून ही निवडणूक जिंकवून दाखवली. ट्रम्प यांच्या धमक्यांना भीक न घालता ममदानी यांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून दिला. जोहरान ममदानी यांच्या या विजयामुळे अनेक विक्रम एकाचवेळी रचले.
advertisement
सर्वात तरुण मुस्लीम महापौर
ममदानी हे केवळ ३४ वर्षांचे आहेत आणि ते न्यूयॉर्क सिटीचे गेल्या १०० वर्षांतील सर्वात तरुण महापौर ठरले. याशिवाय, ममदानी हे न्यूयॉर्कचे महापौर बनणारे पहिले भारतीय वंशाचे मुस्लीम आहेत. निवडणुकीपूर्वी झालेल्या सर्वेक्षणांमध्येही ममदानी महापौरपदासाठी सर्वात आवडते उमेदवार म्हणून समोर आले होते आणि त्यांनी अपेक्षेनुसार ही निवडणूक जिंकली. ममदानी यांची पार्श्वभूमी अत्यंत रंजक आहे. ते प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या मीरा नायर यांचे सुपुत्र आहेत आणि राजकारणात येण्यापूर्वी ते स्वतः एक रॅपर म्हणून ओळखले जात होते. त्यांचा जन्म युगांडाची राजधानी कंपाला येथे झाला होता, पण वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी ते न्यूयॉर्कला आले आणि इथले नागरिक बनले.
advertisement
सर्वेक्षणातून समोर आली अपडेट
न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या या निवडणुकीत ममदानी यांचा सामना दोन प्रमुख उमेदवारांशी होता. न्यूयॉर्कचे माजी गव्हर्नर असलेले अँड्र्यू कुओमो हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते, तर रिपब्लिकन पक्षाकडून कर्टिस स्लिवा यांना उमेदवारी देण्यात आली होती. निवडणुकीच्या सर्वेक्षणांमध्ये कुओमो आणि स्लिवा हे दोघेही ममदानी यांच्या तुलनेत मागे होते आणि निवडणुकीच्या निकालांनीही त्यांना निराशाच हाती लागली.
advertisement
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का
view commentsडोनाल्ड ट्रम्प यांनी ममदानी यांच्या विजयाला विरोध दर्शवला होता. या निवडणुकीच्या निकालामुळे ट्रम्प यांच्या विचारधारेला मोठा धक्का बसल्याचे मानलं जात आहे. न्यूयॉर्कसारख्या महत्त्वाच्या शहरात अल्पसंख्याक वंशाच्या आणि तरुण उमेदवाराला मिळालेला हा विजय अमेरिकेतील राजकीय बदलाचा आणि विविधतेचा महत्त्वपूर्ण संदेश देणारा आहे. ममदानी यांचा विजय केवळ न्यूयॉर्कसाठीच नाही, तर अमेरिकेतील भारतीय वंशाच्या आणि मुस्लिम समुदायासाठी एक महत्त्वपूर्ण यश मानला जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 05, 2025 9:10 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
ज्याला विरोध तोच निवडून आला! ट्रम्प यांना झटका, भारतीय वंशाच्या मुस्लीम तरुणानं इतिहास घडवला, न्यूयॉर्कच्या महापौरपदी विजयी


