पाकच्या लष्कराला मोठा दणका, सैन्याच्या तळावर आत्मघातकी हल्ला, अंदाधुंद गोळीबार, 10 ठार
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पाकिस्तानच्या क्वेटा शहरात फ्रंटियर कॉर्प्स मुख्यालयाजवळ आत्मघातकी स्फोट व गोळीबार झाला, 10 मृत्यू, 32 जखमी, परिसरात दहशत आणि आपत्कालीन घोषणा.
पाकिस्तानला उद्ध्वस्त करण्यासाठी थेट सैन्याला टार्गेट करण्यात आलं आहे. यावेळी पाकिस्तानमध्ये घुसून आत्मघातकी हल्ला करण्यात आला. यामध्ये सैन्याचे तळ उद्ध्वस्त करण्याचा डाव होता. इतकंच नाही तर त्यानंतर अंदाधुंद गोळीबारही झाला. ही धक्कादायक घटना पाकिस्तानच्या क्वेटा शहरात घडली. सैन्याच्या मुख्यालयाला टार्गेट करण्यात आलं. पूर्व क्वेटा इथे फ्रंटियर कॉर्प्स मुख्यालयाजवळ मंगळवारी हा आत्मघातकी हल्ला करण्यात आला.
स्फोटानंतर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. स्फोट इतका भयंकर होता की आजूबाजूच्या परिसरात हादरे बसले. स्फोटानंतर परिसरात दहशतीचं वातावरण होतं. क्वेटा अत्यंत संवेदनशील परिसर मानला जातो. तिथे घुसून थेट हल्ला करणं ही पाकिस्तानला हादरवून टाकण्यासारखी स्थिती आहे. या स्फोटानंतर आजूबाजूच्या इमारतींना मोठे हादरे बसले. खिडक्या दरवाजे तुटले. पाकिस्तानची न्यूज वेबसाईट डॉनने दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 32 जण गंभीर जखमी आहेत.
advertisement
REBELS TURNING TABLES ON PAK?
Suicide Bomb Blast in Balochistan's Capital Reportedly Targets paramilitary security force.
Blast followed by gunfire in Quetta, near the HQ of the Frontier Corps. pic.twitter.com/4ux8KvRa9l
— Rahul Shivshankar (@RShivshankar) September 30, 2025
CCTV footage of quetta blast . pic.twitter.com/uhX06tkEXt
— Amir younas khan (@Amiryounaskmu) September 30, 2025
advertisement
स्फोटाची माहिती मिळताच तातडीनं पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल करण्याचं काम सुरू आहे. परिस्थिती खूप भीषण आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बीएमसी आणि ट्रॉम सेंटर इथे आपात्कालीनची घोषणा करण्यात आली आहे. नर्स, पॅरामेडिकल, डॉक्टर यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. स्फोटानंतर परिसरात धुराचे मोठे लोळ दिसल्याचं स्थानिकांनी सांगितलं. सुरक्षा दलाकडून कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 30, 2025 2:01 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
पाकच्या लष्कराला मोठा दणका, सैन्याच्या तळावर आत्मघातकी हल्ला, अंदाधुंद गोळीबार, 10 ठार