कुणीतरी आवरा! पाकिस्तानात स्वातंत्र्यदिन साजरा करताना हवेत गोळीबार, 3 ठार, 64 जखमी
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
आज १४ ऑगस्ट रोजी पाकिस्तानात सर्वत्र स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. उत्साहाच्या भरात केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
कराची: भारताच्या शेजारी राष्ट्र पाकिस्तानमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. इथं आज १४ ऑगस्ट रोजी पाकिस्तानात सर्वत्र स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. पण स्वातंत्र्याचा आनंद साजरा करत असताना, आनंदाचे रूपांतर शोकात झालं. उत्साहात केलेल्या हवाई गोळीबारामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. निष्काळजीपणे केलेल्या हवाई गोळीबारात एका वृद्ध पुरुष आणि एका ८ वर्षांच्या मुलीसह तीन जणांचा मृत्यू झाला.
गुरुवारी, बचाव अधिकाऱ्यांनी जिओ न्यूजला सांगितले की, शहरातील वेगवेगळ्या भागात गोळ्या झाडून किमान ६४ लोक जखमी झाले. आपण चित्रपटांमध्ये अनेकदा पाहिलं असेल की दहशतवादी आनंद साजरा करण्यासाठी त्यांच्या AK-४७ ने हवेत गोळीबार करतात. दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानमध्ये, सामान्य लोकही असाच काहीसा उत्सव साजरा करतात. कोणत्याही उत्सवात हवेत गोळीबार केल्याचे प्रकार घडतात. प्रत्येक वेळी लोक गंभीर जखमी होतात.
advertisement
स्थानिक प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अजीजाबादमध्ये एका निष्पाप मुलीला गोळी लागली, तर कोरंगी परिसरात स्टीफन नावाच्या व्यक्तीचा गोळीबारात मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, लियाकताबाद, कोरंगी, लियारी, महमूदाबाद, अख्तर कॉलनी, कीमारी, जॅक्सन, बलदिया, ओरंगी टाउन आणि पापोश नगरसह अनेक भागात हवाई गोळीबाराच्या घटना घडल्या. शरीफाबाद, उत्तर नाझिमाबाद, सुरजानी टाउन, जमान टाउन आणि लांधी येथेही असेच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
advertisement
20 हून अधिक जणांना अटक
वेगवेगळ्या गोळीबारात जखमी झालेल्या लोकांना सिव्हिल, जिन्ना आणि अब्बासी शहीद रुग्णालयात तसेच गुलिस्तान-ए-जौहर आणि इतर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी वेगवेगळ्या भागातून २० हून अधिक संशयितांना अटक केली आहे आणि त्यांच्याकडून आधुनिक शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे.
Location :
Delhi
First Published :
August 14, 2025 7:07 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
कुणीतरी आवरा! पाकिस्तानात स्वातंत्र्यदिन साजरा करताना हवेत गोळीबार, 3 ठार, 64 जखमी