advertisement

जगाला न सांगता चीनने मोठी 'साफसफाई'; देशातून टॉपच्या अण्वस्त्र वैज्ञानिकाचा पत्ता कट, जगभरात संशय बळावला!

Last Updated:

China News: चीन मधील काही प्रमुख संरक्षण आणि अण्वस्त्र तज्ज्ञांची प्रोफाइल अचानक CAEच्या वेबसाइटवरून हटवण्यात आल्याने नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.

News18
News18
बीजिंग: चीन मध्ये पुन्हा एकदा सत्ता, लष्कर आणि संरक्षण व्यवस्थेबाबत गूढ वातावरण निर्माण झाले आहे. देशातील प्रमुख अण्वस्त्र वैज्ञानिकांपैकी एक मानले जाणारे झाओ शियांगेंग यांची प्रोफाइल चीनमधील प्रतिष्ठित Chinese Academy of Engineering (CAE) च्या वेबसाइटवरून अचानक हटवण्यात आली आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार ही माहिती समोर आली आहे.
इतकेच नाही तर रडार तंत्रज्ञानातील तज्ज्ञ वू मानचिंग आणि क्षेपणास्त्र डिझाइन तज्ज्ञ वेई यीइन यांच्याशी संबंधित ऑनलाइन प्रोफाइलही गायब झाल्याचे सांगितले जात आहे. या बदलांबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र चीनमध्ये अशा प्रकारे अचानक प्रोफाइल हटवणे हे सहसा मोठ्या राजकीय किंवा संस्थात्मक घडामोडींचे संकेत मानले जातात.
झाओ शियांगेंग कोण आहेत?
झाओ शियांगेंग हे 72 वर्षांचे असून चीनच्या अण्वस्त्र संशोधन संरचनेतील अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व मानले जातात. ते CAE चे सदस्य राहिले आहेत. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात CAE ही चीनमधील सर्वात प्रतिष्ठित अकादमिक संस्थांपैकी एक मानली जाते.
advertisement
जरी CAE च्या वेबसाइटवरून त्यांची प्रोफाइल हटवण्यात आली असली तरी Institute of Applied Physics and Computational Mathematics या बीजिंगस्थित संस्थेच्या वेबसाइटवर रविवारीपर्यंत त्यांचे नाव 13 विद्वानांमध्ये दिसत होते. हेच संस्थान झाओ यांना चीनच्या अण्वस्त्र संशोधनातील प्रमुख अकादमिक आणि तांत्रिक नेतृत्व मानते.
ही संस्था रणनीतिक शस्त्रांच्या सिद्धांत, डिझाइन आणि संशोधनावर काम करणारे आपल्या प्रकारचे एकमेव केंद्र मानली जाते. येथे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, पारंपरिक शस्त्रांचे प्रगत तंत्रज्ञान, फ्यूजन ऊर्जा आणि इतर संवेदनशील क्षेत्रांवर संशोधन केले जाते.
advertisement
झाओ यांनी याच संस्थेतून 1991 मध्ये डॉक्टरेट मिळवली होती. तसेच 2008 ते 2015 या काळात ते या संस्थेचे अध्यक्षही होते. संस्थेच्या माहितीनुसार त्यांनी अनेक राष्ट्रीय संरक्षण प्रकल्प, तांत्रिक योजना आणि अणुविज्ञानाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
तज्ज्ञाचीही प्रोफाइल हटवली
याचप्रमाणे रडार तज्ज्ञ वू मानचिंग यांची प्रोफाइलही CAE च्या वेबसाइटवरून हटवण्यात आली आहे. चीनच्या हवाई इशारा प्रणालीच्या (Airborne Early Warning System) विकासात त्यांची महत्त्वाची भूमिका मानली जाते. त्यांच्या संशोधनाचा परिणाम KJ-500 या विमानाच्या रूपाने समोर आला, ज्याचा वापर चीनी हवाई दल करते. वू हे China Electronics Technology Group Corporation या कंपनीतही उच्च पदावर कार्यरत होते. अहवालानुसार 2025 मध्ये त्यांना CAE च्या उपाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले होते.
advertisement
मिसाइल डिझाइन तज्ज्ञ वेई यीइन
तिसरे नाव वेई यीइन यांचे आहे. ते मिसाइल डिझाइन आणि गाइडन्स कंट्रोल तंत्रज्ञानातील तज्ज्ञ मानले जातात. वेई यांची 2019 मध्ये CAE च्या अकादमिक सदस्य म्हणून निवड झाली होती. यापूर्वी 2023 मध्ये त्यांना China Aerospace Science and Industry Corporation या सरकारी संरक्षण कंपनीतील उपमहाव्यवस्थापक पदावरून बदलण्यात आल्याची माहिती समोर आली होती. हीच कंपनी मिसाइल प्रणाली, सॉलिड रॉकेट आणि अवकाश उपकरणे यांसारखी संरक्षण सामग्री तयार करते.
advertisement
ही बातमी महत्त्वाची का?
या तीनही वैज्ञानिकांची नावे एकाच वेळी चर्चेत येणे विशेष महत्त्वाचे मानले जात आहे. कारण दोन महिन्यांपूर्वी चीनच्या संरक्षण मंत्रालयाने उच्चपदस्थ जनरल झांग यूश्या आणि केंद्रीय लष्करी आयोगाचे सदस्य लियू झेनली यांच्यावर चौकशी सुरू असल्याचे सांगितले होते.
त्यांना लष्करामध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेशी जोडले जात आहे. अशा परिस्थितीत संरक्षण विज्ञान आणि रणनीतिक शस्त्रास्त्रांशी संबंधित प्रमुख वैज्ञानिकांची प्रोफाइल अचानक हटवली जाणे यामुळे चीनच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर्गत तपास, कारवाई किंवा राजकीय उलथापालथ सुरू असल्याच्या चर्चा अधिकच वाढल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
जगाला न सांगता चीनने मोठी 'साफसफाई'; देशातून टॉपच्या अण्वस्त्र वैज्ञानिकाचा पत्ता कट, जगभरात संशय बळावला!
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement