Israel-Iran युद्धात मोठी घडामोड; रशियाची थरारक ऑफर, इराणला सांगितले- तुमचे युरेनियम...

Last Updated:

Israel-Iran War Latest News: रशियाने इस्रायल-इराण संघर्षात मध्यस्थीची तयारी दर्शवली आहे. इराणचं युरेनियम रशियामध्ये साठवण्याचा प्रस्ताव अजूनही कायम आहे. रशियाने दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे.

News18
News18
मॉस्को: इस्रायल आणि इराणमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियाने पुन्हा एकदा मध्यस्थीची तयारी दर्शवली आहे. क्रेमलिनकडून सोमवारी सांगण्यात आलं की, इराणचं संवर्धित युरेनियम रशियामध्ये साठवण्याचा जुना प्रस्ताव अजूनही कायम आहे आणि त्यावर विचार करण्याची वेळ गेलेली नाही.
रशियाने सुचवलेल्या प्रस्तावानुसार, इराणमधील युरेनियम देशातून हटवून ते नागरी वापरासाठी असलेल्या अणुऊर्जा इंधनामध्ये रूपांतरित करावं, जेणेकरून तणाव कमी होईल. पण सध्याच्या लष्करी कारवायांमुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे, असं क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी स्पष्ट केलं.
इराणने शांततेच्या हेतूनं अणुऊर्जा वापरण्याचा आपला हक्क असल्याचं म्हटलं आहे. मात्र त्यांच्या जलद गतीने सुरू असलेल्या युरेनियम संवर्धन कार्यक्रमामुळे पश्चिमी देशांमध्ये आणि गल्फ देशांमध्ये इराण अण्वस्त्र तयार करत असल्याची भीती निर्माण झाली आहे.
advertisement
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी आशावाद व्यक्त केला की लवकरच शांतता प्रस्थापित होईल आणि यामध्ये रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
पेस्कोव यांनी सांगितलं, रशिया अजूनही या संघर्षाचे मूळ कारण दूर करण्यासाठी आवश्यक ते सर्व करण्यास तयार आहे. पण परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, ती अधिकच चिघळत चालली आहे आणि याचा परिस्थितीवर वाईट परिणाम होतो आहे.
advertisement
इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी रविवारी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत, इस्रायलच्या लष्करी कारवायांमुळे इराणमध्ये सत्ताबदल होऊ शकतो, असं वक्तव्य केलं. यावर प्रतिक्रिया देताना पेस्कोव म्हणाले, आम्ही या वक्तव्यांची नोंद घेतली आहे. आमचं मत स्पष्ट आहे – इराणवर चालवले जाणारे बॉम्बहल्ले हे फक्त संघर्ष वाढवत आहेत. आणि यामुळे इराणमधील जनतेमध्ये मोठं एकात्मत्व तयार झालं आहे.
advertisement
रशिया जरी पुन्हा मध्यस्थीला तयार झाले असेल तरी इस्रायल-इराण संघर्षाने परिस्थिती अत्यंत स्फोटक बनवली आहे . रशियाने दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं आणि मूलभूत कारणांवर तोडगा शोधण्याचं आवाहन केलं आहे.
मराठी बातम्या/विदेश/
Israel-Iran युद्धात मोठी घडामोड; रशियाची थरारक ऑफर, इराणला सांगितले- तुमचे युरेनियम...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement