जिथे आयुष्याची सुरुवात, तिथेच अंत, पत्नीही पायलट, दुबईत एअर शोत शहीद झालेल्या पायलटची मन सुन्न करणारी कहाणी
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Tejas Fighter Jet Accident in Dibai Air Show: दुबई एअर शो २०२५ दरम्यान झालेल्या एका अत्यंत दुःखद घटनेत भारतीय वायुसेनेचे (IAF) लढाऊ विमान एलसीए तेजस क्रॅश झालं.
Tejas Fighter Jet Accident in Dibai Air Show: दुबई एअर शो २०२५ दरम्यान झालेल्या एका अत्यंत दुःखद घटनेत भारतीय वायुसेनेचे (IAF) लढाऊ विमान एलसीए तेजस क्रॅश झालं. या अपघातात धाडसी वैमानिक म्हणून ओळख असलेल्या नमन सियाल (वय ३५) यांना वीरमरण आलं. नमन सियाल हे मुळचे हिमाचल प्रदेशातील रहिवासी आहेत. नमन सियाल यांच्या निधनामुळे केवळ त्यांच्या कुटुंबीयांवरच नाही, तर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.
भारतीय वेळेनुसार, शुक्रवारी दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी दुबईतील अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेमो फ्लाईट आणि हवाई कसरतीदरम्यान हा भीषण अपघात झाला. नमन सियाल हे भारतीय वायुसेनेतील एक कुशल आणि धाडसी वैमानिक म्हणून ओळखले जात होते. मात्र एअर शो दरम्यान नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला.
पत्नीही वायू दलात पायलट
नमन सियाल यांच्या वैयक्तिक आयुष्याची कहाणी देखील तितकीच रंजक आहे. त्यांची पत्नी अफशां यादेखील भारतीय वायुसेनेत वैमानिक आहेत. नमन आणि अफशां यांचं १६ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं आणि त्यांना ७ वर्षांची एक मुलगी देखील आहे. नमन यांनी अफशां यांच्याशी दुबईमध्ये लग्न केलं होतं आणि ते आपल्या कुटुंबासह अनेकदा तिथे वास्तव्यास असायचे. ते मधूनमधून आपल्या वडिलोपार्जित पतियाळकर या गावी येत असत.
advertisement
नमन सियाल यांचे वडील गगन कुमार हे देखील भारतीय सैन्यात अधिकारी होते आणि नंतर शिक्षण विभागात रुजू झाले. काही वर्षे आधी ते मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. देशसेवेचा वारसा लाभलेल्या या वीरपुत्राच्या अचानक जाण्याने संपूर्ण नगरोटा बगवां परिसरात आणि कांगडा जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. नमन सियाल यांचे पार्थिव मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारकडून आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 22, 2025 7:37 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
जिथे आयुष्याची सुरुवात, तिथेच अंत, पत्नीही पायलट, दुबईत एअर शोत शहीद झालेल्या पायलटची मन सुन्न करणारी कहाणी


